मराठी बातम्या /बातम्या /करिअर /मोठी CA आणि लहान मुलगी UPSC उत्तीर्ण, भाजपचे खासदार ओम बिरला स्वतः किती शिकलेत?

मोठी CA आणि लहान मुलगी UPSC उत्तीर्ण, भाजपचे खासदार ओम बिरला स्वतः किती शिकलेत?

लोकसभेचे खासदार (Loksabha MP) ओम बिरला (Om Birla) सध्या राजकारणामुळे नाही तर एका वेगळ्याचं कारणामुळे चर्चेत आहेत. कारण अलिकडेच त्यांची छोटी मुलगी अंजलीने (Anjali Birla) UPSC परिक्षा उत्तीर्ण केली आहे. शिवाय त्यांची मोठी मुलगी आकांक्षाही (Akanksha Birla) सीए आहे.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 11 जानेवारी: लोकसभेचे खासदार ओम बिरला (MP Om Birla) सध्या राजकारणामुळे नाही तर एका वेगळ्याचं कारणामुळे चर्चेत आहेत. कारण अलिकडेच त्यांची छोटी मुलगी अंजलीने (Anjali Birla) UPSC परीक्षा उत्तीर्ण केली आहे. शिवाय त्यांची मोठी मुलगी आकांक्षाही (Aakanksha Birla) सीए (CA) आहे. आपल्या मुलींना एवढं शिकवून करीअरमध्ये (Career) महत्त्वाच्या पदापर्यंत पोहचवल्यामुळं ओम बिरला यांचं शिक्षणाप्रति असलेला आदर ठळक दिसतो. पण स्वतः ओम बिरला किती शिकले आहे, ही माहिती करून घेण्याची उत्सुकता अनेकांना होती. चला तर मग जाणून घेऊया..

ओम बिरला यांचा जन्म 4 डिसेंबर 1962 साली कोटा येथे झाला. त्यांचे वडील सरकारी खात्यात नोकरीला होते. ते टॅक्स विभागात कामाला होते. त्यांनी त्यांच सुरुवातीचं शिक्षण राजस्थान कोटा येथून पुर्ण केलं. त्यानंतर त्यांनी महर्षी दयानंद कॉलेजमधून B.Com आणि  M.Com ची पदवी घेतली. त्यांची राजकीय कारकीर्द विद्यार्थी नेता म्हणून झाली. त्यांनी सुरुवातीला विद्यार्थी निवडणूक जिंकली होती. त्याचवेळी त्यांनी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिलं आहे.

शिवाय ओम बिर्ला हे 1992 ते 1997 या कालावधीत भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष होते. नंतर त्यांनी राजस्थान आणि राष्ट्रीय पातळीवर कोऑपरेटिव्ह चळवळीशी संबंधित कामही केलं आहे. आता ओम बिरला यांनी पाचवेळी निवडणूका लढवल्या आहेत. यावेळी ते तीन वेळा आमदार आणि दोन वेळा खासदार बनले आहेत. 2003 मध्ये ओम बिर्ला यांनी कॉंग्रेसचे दिग्गज नेते शांती धारीवाल यांचा पराभव करून विधानसभेत प्रवेश केला होता. यानंतर त्यांनी राजकारणात मागे वळून पाहिलं नाही. सध्या ते लोकसभेचे सभापती आहेत.

First published:
top videos

    Tags: BJP