मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Success Story: रोज फक्त 4 तास अभ्यास अन् जोडीला NETFLIX; तरीही NEET मध्ये पैकीच्या पैकी मार्क्स

Success Story: रोज फक्त 4 तास अभ्यास अन् जोडीला NETFLIX; तरीही NEET मध्ये पैकीच्या पैकी मार्क्स

न्यूज 18ने घेतलेल्या विशेष मुलाखतीत त्याने आपल्या यशाचं रहस्य सांगितलं.

न्यूज 18ने घेतलेल्या विशेष मुलाखतीत त्याने आपल्या यशाचं रहस्य सांगितलं.

न्यूज 18ने घेतलेल्या विशेष मुलाखतीत त्याने आपल्या यशाचं रहस्य सांगितलं.

स्पर्धा परीक्षेत अव्वल स्थान पटकावलेल्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती पाहिल्या किंवा वाचल्या, की एक समान सूत्र आढळून येतं, ते म्हणजे प्रत्येकाने दररोज किमान 10 ते 12 तास अभ्यास केलेला असतो. शिवाय मनोरंजनाच्या (Entertainment) साधनांपासून चार हात दूर राहणंच पसंत केलेलं असतं. यंदाच्या NEET परीक्षेत 720 पैकी 720 मार्क्स मिळवून देशात पहिला आलेल्या मृणाल कुट्टेरी (Mrunal Kutteri) याची गोष्ट मात्र अगदीच वेगळी आहे. नीट परीक्षेच्या तयारीच्या अडीच वर्षांच्या काळात त्याने दररोज केवळ चार तास अभ्यास केला आणि तोही दररोज विशिष्ट अशा रूटिनने केला नाही. दर पाऊण तासाने तो ब्रेक घेत असे. शिवाय नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइमवर बिंज वॉचिंगही (Binge Watching) सुरू होतं. तरीही तो इतकं धवल यश मिळवू शकला. न्यूज 18ने घेतलेल्या विशेष मुलाखतीत त्याने आपल्या यशाचं रहस्य सांगितलं.

'कोणत्याही टॉपर्सच्या (Topper) इंटरव्ह्यूत ते किमान 12 तास अभ्यास करत असल्याचं वाचलं की मला भीती वाटायची. महामारीच्या काळात मी घरी होतो, तेव्हा फोन, टीव्ही, लॅपटॉप या सगळ्या गोष्टी उपलब्ध होत्या. सुरुवातीला त्यांच्यामुळे अभ्यासात व्यत्यय येतोय असं वाटत होतं. त्यामुळे मला प्रयत्नपूर्वक अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं लागायचं; पण हळूहळू ही परिस्थिती सुधारत गेली. मी दररोज चार तास अभ्यास करू लागलो,' असं त्याने सांगितलं.

एकच फॉर्म्युला सगळ्यांना लागू पडत नाही, हे त्याने आवर्जून नमूद केलं. 'सर्व यशस्वी विद्यार्थ्यांच्या मुलाखती वाचल्या, की त्यातून त्यांचं रूटीन आणि अभ्यासाचं निश्चित वेळापत्रक त्यांना उपयोगी पडल्याचं कळतं. मीदेखील तसंच रूटीन पाळण्याचा प्रयत्न केला; मात्र नंतर असं लक्षात आलं, की असं निश्चित काही ठरवून अभ्यास करण्याचा फॉर्म्युला (Study Formula) आपल्याला उपयोगी पडत नाहीये. त्यामुळे मी माझ्या पद्धतीने अभ्यास केला. माझे आई-वडील आणि शिक्षक यांनी मला त्यापासून परावृत्त केलं नाही, हे माझं भाग्य. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या, त्यासाठी तयारी करणाऱ्या प्रत्येकाने धाडसी असलं पाहिजे आणि प्रयोग करत राहिलं पाहिजे. आपल्याला नेमकं काय उपयोगी पडतंय, हे ओळखून तेच अंमलात आणलं पाहिजे. दुसरं कोण काय सांगतंय, याकडे लक्ष देण्याची गरज नाही. माझ्या बाबतीत अभ्यास आणि मनोरंजन या दोन्हींचं संतुलन साधलं गेल्यामुळे मला त्याचा चांगला उपयोग झाला,' असं मृणाल म्हणाला.

कंटाळून वयाच्या 21व्या वर्षी तिनं सोडली नोकरी; आज कमवतेय लाखो रुपये

प्रत्यक्ष पेपर सोडवताना बहुतांश टॉपर्स बायोलॉजी (Biology) सेक्शन सर्वप्रथम सोडवतात. मृणालने याही बाबतीत वेगळी कामगिरी केली. त्याने बायोलॉजी सेक्शन सर्वांत शेवटी, तर फिजिक्स सेक्शन सर्वांत पहिल्यांदा सोडवला. फिजिक्सला अधिक वेळ मिळू शकेल आणि बायोलॉजी तुलनेने सोपं असल्याने शेवटच्या कमी वेळातही चांगल्या प्रकारे सोडवता येईल, असा विचार त्याने केला.

2020 साली 11वीत असल्यापासून मृणाल नीट परीक्षेसाठी तयारी करतो आहे. कोरोना काळात वर्ग ऑनलाइन झाले. त्या काळात अभ्यासाचं नुकसानही झालं. 'त्या काळात डॉक्टर्स हे आपल्या देशाची क्षमता दर्शवत होते. त्यांचं काम पाहून प्रेरणा मिळाली आणि आपल्यालाही एक दिवस डॉक्टरच बनायचं आहे, यासाठी प्रोत्साहन मिळालं,' असं त्याने सांगितलं.

आता मृणाल 18 वर्षांचा झाला असून, नवी दिल्लीतल्या एम्स (AIIMS) संस्थेतून MBBS पदवी घेण्याचं त्याचं स्वप्न आता तो पूर्ण करू शकणार आहे. त्यांच्या कुटुंबातला तो पहिलाच डॉक्टर असेल. पूर्वी एम्ससाठी वेगळी प्रवेश परीक्षा असे. या वर्षी मात्र नीट परीक्षेच्या आधारेच एम्समध्ये प्रवेश दिले जाणार आहेत. त्यामुळे स्वप्नपूर्तीसाठी एकच पर्याय होता आणि तो साध्य करण्यात यशस्वी झाल्याचं समाधान वाटत असल्याचं मृणालने सांगितलं.

720 पैकी 720 मार्क्स मिळवण्याची कामगिरी तिघांनी केली आहे. त्यात मृणालचा समावेश आहे. All India Rank 1 असा आपल्या स्कोअरकार्डवरचा उल्लेख पाहून अत्यानंद झाल्याचं त्याने सांगितलं. आन्सर-की प्रसिद्ध झाल्यानंतर आपण टॉपरपैकी एक असू, याचा त्याला अंदाज आला होता; मात्र तो सर्वप्रथम आला.

मृणालला सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षेत 88.6 टक्के मार्क्स मिळाले आहेत. नीट आणि बारावी या दोन्हींचा अभ्यासक्रम एकच असला, तरीही परीक्षांच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत आणि 'सब्जेक्टिव्ह आन्सर्स'मध्ये आपली कामगिरी फारशी चांगली नाही, असंही त्याने सांगितलं.

First published:

Tags: Success stories