मराठी बातम्या /बातम्या /करिअर /Success Story: पायात घालायला चप्पलही नव्हती, आज इंजिनिअर बनत आईला दिलेलं वचनही केलं पूर्ण

Success Story: पायात घालायला चप्पलही नव्हती, आज इंजिनिअर बनत आईला दिलेलं वचनही केलं पूर्ण

लहानपणी घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे, आपल्या आईला दुसऱ्यांच्या घरी काम करावं लागल्याचेही भावेशने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

लहानपणी घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे, आपल्या आईला दुसऱ्यांच्या घरी काम करावं लागल्याचेही भावेशने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

लहानपणी घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे, आपल्या आईला दुसऱ्यांच्या घरी काम करावं लागल्याचेही भावेशने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

    नवी दिल्ली, 29 जुलै : अगदी हालाखीच्या परिस्थितीतून वर येत, चांगली कामगिरी करणाऱ्या तरुणांच्या कथा (Success story) आपण नेहमी वाचत असतो. ‘लिंक्ड इन’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अशाच एका तरुणाने आपली कथा सांगितली आहे. भावेश लोहार (Bhavesh Lohar) असं या तरुणाचं नाव आहे. उदयपूरमध्ये राहणाऱ्या भावेशने (Udaypur Bhavesh Lohar story) अवघ्या 6x6 च्या छोट्या खोलीमध्ये अभ्यास करुन फोर्ड कंपनीमध्ये नोकरी मिळवली आहे. भावेशची स्ट्रगल स्टोरी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होते आहे.

    भावेश आपल्या पोस्टमध्ये सांगतो, की लहानपणी परिस्थिती इतकी बेताची होती, की कित्येक वेळा पायात घालण्यासाठी चपलाही नसत. त्यामुळे हायवेवरुन अनवाणीच चालत तो शाळेत जायचा. हायवेवरील गाड्या पाहत पाहत, आपणही मोठं झाल्यावर कोणती गाडी घ्यायची याबाबत तो आणि त्याचे मित्र चर्चा करत. याचदरम्यान त्याने वृत्तपत्रात आलेली फोर्ड फिगो गाडीची जाहिरात पाहिली होती. तेव्हापासूनच ती भावेशची ‘ड्रीम कार’ झाली होती. विशेष म्हणजे, भावेशने या आपल्या स्वप्नाचा पाठलाग करणं सोडलं नाही, आणि आज तो फोर्ड कंपनीतच सॉफ्टवेअर इंजिनिअर (Bhavesh Lohar) म्हणून काम करत आहे. TV9 हिंदीने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

    आईला दिलेलं वचन केलं पूर्ण

    लहानपणी घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे, आपल्या आईला दुसऱ्यांच्या घरी काम करावं लागल्याचेही भावेशने आपल्या पोस्टमध्ये (Bhavesh lohar linked in post) म्हटले आहे. वडिलांचा पगार साधारणपणे सात-आठ हजार होता. या पगारात घराचा आणि भावेशच्या शिक्षणाचा खर्च करणे शक्य नव्हते. त्यामुळे त्याची आई इतरांच्या घरी कामाला जात होती. आपल्या यशाचं श्रेय भावेशने त्याच्या आईला आणि बहि‍णींना दिलं आहे. भावेशने आपल्या आईला लहानपणी वचन दिलं होतं, की तो पैसे कमवायला लागल्यानंतर त्यांना काम करण्याची गरज पडणार नाही. हेच वचन (Bhavesh Lohar struggle story) तो आता पूर्ण करताना दिसत आहे.

    गरीब कुटुंबात जन्मलेले IPS ऑफिसर प्रेमसुख डेलू; 12 वेळा मिळवली सरकारी नोकरी

    शिक्षणासाठी बाहेर राहणाऱ्या भावेशला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावलेल्या लॉकडाऊनमुळे घरी परत यावं लागलं. मात्र, छोटं घर आणि सात कुटुंबीय यामुळे त्याचा अभ्यास होण्याची शक्यताच नव्हती. यामुळे भावेशने घराबाहेर एक 6x6 ची छोटीशी खोली बांधून घेतली, जिथे तो अभ्यास करत असे. याच छोट्याशा खोलीमधून त्याने कित्येक कंपन्यांचे इंटरव्ह्यूही दिले.

    भावेश म्हणतो, की आय़ुष्यात एवढा संघर्ष करावा लागला ही चांगलीच गोष्ट आहे. यामुळेच मी इथून पुढे कोणत्याही परिस्थितीला तोंड देऊ शकतो. भावेशची लिंक्ड इनवरील पोस्ट वाचण्यासाठी तुम्ही या (https://www.linkedin.com/posts/bhavesh-lohar-37b883176_gratitude-work-softwareengineer-activity-6824034555129921536-578H) लिंकवर क्लिक करू शकता.

    First published:
    top videos