मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

नोकरी किंवा शिक्षणासाठी परदेशात जाताय? जरा थांबा; तुमची फसवणूक तर होत नाहीये ना?

नोकरी किंवा शिक्षणासाठी परदेशात जाताय? जरा थांबा; तुमची फसवणूक तर होत नाहीये ना?

असे व्हा सावध

असे व्हा सावध

आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्या तुम्ही परदेशात शिक्षणासाठी जाण्याआधी तपासून घेणं आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊया.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 02 ऑक्टोबर: परदेशात शिक्षणासाठी जाण्याचं अनेक विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं. त्यासाठी प्रचंड मेहनत करून आणि चांगले गुण मिळवून विध्यर्थ स्वतःला तयारही करतात. पण परदेशात शिक्षण म्हंटलं की मोठ्या प्रमाणावर पैशांची उभारणी करावी लागते. जाण्यापासून राहण्यापर्यंतचा खर्च लाखो रुपये असतो. त्यात काही देश हे विद्यार्थ्यांचे लाडके आहेत. कॅनडा, आयर्लंड, अमेरिका, जर्मनी, अमेरिका, ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये विद्यार्थी जातात. मात्र जर तुम्ही नवीन असाल आणि तुम्हालाही उच्च शिक्षणासाठी जायची इच्छा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्या तुम्ही परदेशात शिक्षणासाठी जाण्याआधी तपासून घेणं आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊया.

परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्या देशाशी आणि विद्यापीठाशी संबंधित आवश्यक माहिती गोळा करावी. गेल्या काही वर्षांत परदेशात शिक्षणाच्या नावाखाली अनेक घोटाळे चव्हाट्यावर आले आहेत. हे टाळण्यासाठी, आपण करिअर समुपदेशक, सल्लागार इत्यादी सर्व गोष्टी शोधून काढणे आणि त्यानंतरच परदेशात जाण्यासाठी त्यांची मदत घेणे महत्वाचे आहे.

काय सांगता! शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएशन अन् 50 हजार पगार? संधी सोडू नका, लगेच करा अर्ज

शैक्षणिक घोटाळा कसा टाळायचा

परदेशातून उच्च शिक्षणाच्या नावाखाली अनेक प्रकारचे घोटाळे होत आहेत. यामुळे तुमची बँक बॅलन्स रिकामी होऊ शकते. काही मार्ग जाणून घ्या, ज्याद्वारे तुम्ही हे घोटाळ टाळू शकता.

सर्व प्रथम, ते महाविद्यालय खरोखर त्या देशात आहे की नाही ते शोधा. कोणत्याही महाविद्यालयात प्रवेशाचे आश्वासन देऊन अनेक एजंट विद्यार्थ्यांची फसवणूक करतात. हे टाळण्यासाठी, कॉलेजच्या अधिकृत वेबसाइटला पूर्णपणे भेट दिल्यास मदत होऊ शकते.

परदेशी विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी कायदेशीर सल्लागाराचा सल्ला घ्या. त्यानंतरच तुमची कागदपत्रे जमा करा.

व्हिसा मिळवून देण्याच्या नावाखालीही अनेक एजंट फसवणूक करतात. परदेशात अभ्यास करण्यासाठी, सर्वकाही पूर्णपणे कायदेशीर आणि योग्य मार्गाने करा.

तुम्ही एज्युकेशन लोन घेत असाल तर स्वतः बँक अधिकाऱ्यांना भेटा आणि संपूर्ण प्रक्रिया समजून घ्या. फक्त एजंटवर अवलंबून राहू नका.

First published:

Tags: Career, Career opportunities, Education