मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

सर्वोच्च न्यायालयाची शिफारस, केंद्र सरकारची मंजुरी, बीडचे सुपूत्राची न्यायमूर्तीपदापर्यंत झेप

सर्वोच्च न्यायालयाची शिफारस, केंद्र सरकारची मंजुरी, बीडचे सुपूत्राची न्यायमूर्तीपदापर्यंत झेप

अॅड. संतोष चपळगावकर यांनी 1995 मध्ये बीड येथील जिल्हा न्यायालयातून वकिली व्यवसायास सुरुवात केली.

अॅड. संतोष चपळगावकर यांनी 1995 मध्ये बीड येथील जिल्हा न्यायालयातून वकिली व्यवसायास सुरुवात केली.

अॅड. संतोष चपळगावकर यांनी 1995 मध्ये बीड येथील जिल्हा न्यायालयातून वकिली व्यवसायास सुरुवात केली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Khushalkant Dusane

मुंबई, 30 नोव्हेंबर : सर्वोच्च न्यायालयाने न्यायाधीशपदासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या दोन नावांची शिफारस केली होती. त्यातील दोन नावांना केंद्राच्या वतीने मंजुरी देण्यात आली आहे. त्यात बीडचे सुपूत्र अॅड. संतोष चपळगावकर तसेच अॅड. मिलिंद साठ्ये या दोघांचा समावेश झाला आहे. त्यांना 30 नोव्हेंबरला न्यायमूर्तिपदाची शपथ दिली जाईल.

बीडचे सुपूत्र अॅड. संतोष चपळगावकर न्यायमूर्ती -

अॅड. संतोष चपळगावकर हे बीडचे सुपूत्र आहेत. ते आता न्यायमूर्तीपदापर्यंत पोहोचले आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता संबंधिताना पद व गोपनीयतेची शपथ देणार आहेत. अॅड. संतोष गोविंदराव चपळगावकर यांनी कायद्याचे धडे घरातूनच घेतले.

कायद्याचे धडे घरातूनच मिळाले -

मूळ बीड येथील असलेल्या अॅड. संतोष यांचे काका निवृत्त न्या. नरेंद्र चपळगावकर आहेत. तसेच त्यांचे वडील गोविंदराव चपळगावकर हेसुद्धा वकिली व्यवसाय करायचे. अॅड. संतोष चपळगावकर यांनी 1995 मध्ये बीड येथील जिल्हा न्यायालयातून वकिली व्यवसायास सुरुवात केली.

हेही वाचा - वाचाळवीरांना आवरा, राज्यपालांच्या वक्तव्यावरुन अजित पवार भडकले; म्हणाले...

यानंतर औरंगाबाद खंडपीठाचे तत्कालीन न्या. स्व. संतोष बोरा वकिली व्यवसायात असताना त्यांच्याकडे त्यांनी 1997 मध्ये कनिष्ठ वकील म्हणून काहीकाळ काम केले. त्यानंतर त्यांनी स्वतंत्रपणे वकिली व्यवसाय केला. त्यांनी आतापर्यंत साडेपाच हजार याचिका चालविल्या. वडील वकिली व्यवसायात आणि काका न्यायमूर्ती राहिलेल्या चपळगावकर कुटुंबात दुसऱ्या पिढीत न्यायमूर्ती होण्याची संधी अॅड. संतोष चपळगावकर यांच्या रूपाने प्राप्त झाली आहे.

संगीतप्रेमी - 

अॅड. संतोष गोविंदराव चपळगावकर यांनी खासगी कंपन्या, संवैधानिक प्रकरणे आणि दिवाणी प्रकरणांत जास्तीत जास्त काम केले. महापालिका, विद्यापीठ , विविध विमा कंपन्या, एमकेसिएल आदी संस्थांची बाजू औरंगाबाद खंडपीठात प्रभावीपणे मांडली. अॅड. संतोष चपळगावकर क्रिकेट आणि बॅडमिंटनचे चांगले खेळाडू आहेत. तसेच त्यांना संगीताची आवड आहे.

न्यायमूर्तींची संख्या 68 वर -

भारताचे माजी मुख्य सरन्यायाधीश उदय ललित यांच्या नेतृत्वाखालील सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने या वर्षी 12 सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत या दोन वकिलांना मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून बढती देण्याची शिफारस केली होती. यानंतर मुंबई उच्च न्यायालयातील अ‍ॅड. मिलिंद मनोहर साठ्ये आणि औरंगाबाद खंडपीठातील अ‍ॅड. संतोष चपळगावकर यांची मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या न्यायमूर्तींच्या नियुक्तीमुळे मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्तींची संख्या आता 68 झाली आहे.

First published:

Tags: Career, Court, Mumbai, Mumbai high court