मुंबई, 17 मार्च : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी (2022) भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त 10 लाख जणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा निर्धार केला. विविध विभागांमध्ये रिकाम्या असलेल्या जागा भरून कार्यक्षमता वाढवण्याचा सरकारचा मानस आहे. आता ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या ऊर्जा कार्यक्षमता ब्यूरोने (Bureau Of Energy Efficiency) नोकरभरती जाहीर केलीय. कन्सल्टंट (DISCOM) पदासाठी ही भरती होईल. इच्छुक उमेदवारांना या पदाद्वारे चांगल्या पगाराची संधी उपलब्ध होणार आहे. 'स्टडी कॅफे'ने त्याबाबतचं वृत्त दिलं आहे.
एनर्जी एफिशियन्सी ब्यूरोमध्ये कन्सल्टंट पदाच्या 3 जागा भरण्याबाबत नुकतीच विभागानं सूचना जाहीर केली. या पदासाठी उमेदवारांना 1,25,000 रुपये मासिक वेतन मिळेल. पात्रतेच्या निकषांनुसार उमेदवारांची निवड केली जाईल. त्यानंतर मुलाखती घेऊन अंतिम निर्णय घेतला जाईल. पात्र उमेदवारांनी व्यवस्थित भरलेला अर्ज The Secretary, BEE, 4th Floor, Sewa Bhawan, R. K. Puram, Sector-I, New Delhi, 110066 या पत्त्यावर पाठवावा. उमेदवारांची निवड एक वर्षासाठी केली जाईल. अर्धवट भरलेले व नियोजित वेळेत न आलेले अर्ज नाकारण्यात येतील असंही विभागानं सूचनेत म्हटलं आहे.
ONGC Recruitment: रिटायर्ड अधिकाऱ्यांसाठी मोठी खूशखबर; 'या' पदांसाठी पदभरती झाली सुरु; बघा डिटेल्स
पद
ऊर्जा कार्यक्षमता विभागानं कन्सल्टंट या पदासाठी नोकरभरतीची सूचना काढली आहे. ही नियुक्ती एक वर्षासाठी असेल. नियंत्रक अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार, तसंच प्रकल्पाच्या गरजेनुसार नियुक्तीचा कालावधी वाढवलाही जाऊ शकतो.
वयोमर्यादा
ऊर्जा कार्यक्षमता विभागानं जाहीर केलेल्या सूचनेनुसार, अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत पात्र उमेदवारांची कमाल वयोमर्यादा 63 वर्षं असावी असं विभागानं म्हटलंय.
पात्रता
- उमेदवाराकडे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी असावी.
- DISCOM मध्ये किमान 15 वर्षांच्या कामाचा अनुभव असावा.
- ऊर्जा विभागात काम करण्याचा अनुभव असावा.
- अकाउंटिंग/ऑपरेशन्स व मेंटेनन्स/ऊर्जा बचतीबाबत तांत्रिक मूल्यमापन यांचं ज्ञान असावं.
- वीज वितरण क्षेत्रातल्या सध्याच्या ऊर्जा कार्यक्षमता तंत्रज्ञानाची उत्तम माहिती असावी.
प्राधान्यक्रम
- बीईईच्या निकषांनुसार पात्र ठरलेले एनर्जी मॅनेजर किंवा एनर्जी ऑडिटर यांना प्राधान्य दिलं जाईल.
- DISCOM मधल्या एनर्जी अकाउंटिंगच्या कामाची माहिती असलेल्या उमेदवाराला प्राधान्य मिळेल.
- PAT शी संबंधित अॅक्टिव्हिटीजमध्ये सहभाग असणाऱ्यांनाही प्राधान्य मिळेल.
ऊर्जा कार्यक्षमता विभागाच्या अधिकृत सूचनेनुसार, 22 मार्च 2023 ही अर्ज स्वीकृतीची अंतिम तारीख आहे. पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज दिलेल्या पत्त्यावर वेळेत पाठवावेत. या पदासाठी उमेदवारांना मासिक 1,25,000 रुपये वेतन मिळेल. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या संधीचा लाभ घ्यावा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.