• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • 8वी पास ते ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी 'इथे' बंपर भरती; वाचा आणि आताच करा अप्लाय

8वी पास ते ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी 'इथे' बंपर भरती; वाचा आणि आताच करा अप्लाय

ब्रॉडकास्ट इंजीनिअरिंग कंसल्टंट्स इंडिया लिमिटेड इथे विविध पदासांठी पदभरती होणार आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 27 जून : 8वी पास ते ग्रॅज्युएट नोकरीच्या (Graduate jobs) शोधात असलेल्या उमेदवरांसाठी बंपर भरती होणार आहे. BECIL म्हणजेच ब्रॉडकास्ट इंजीनिअरिंग कंसल्टंट्स इंडिया लिमिटेड इथे विविध पदासांठी पदभरती होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार बेसिलच्या (Broadcast Engineering Consultants India Limited) अधिकृत वेबसाइट www.becil.com वर ऑनलाईन अर्ज करू शकतात. कोणत्या जागांसाठी पदभरती अप्रेंटिस  किंवा लोडर (Apprentice or Loader)  - एकूण जागा 73 सुपरवायजर (Supervisor) - एकूण जागा 26 सीनियर सुपरवायजर  (Senior Supervisor) - एकूण जागा 4 शैक्षणिक पात्रता सुपरवायजर आणि सीनियर सुपरवायजर या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटीमधून डिग्री घेतली असणं आवश्यक आहे. तसंच कम्प्युटरच्या ज्ञानासह किमान एक वर्षाचा अनुभव असणंही आवश्यक आहे. तसंच लोडर या पदासाठी आठवी पास असणं आवश्यक आहे. हे वाचा - महिलांनो, भारतीय सैन्य दलात मोठी पदभरती; अप्लाय करण्यासाठी इथे करा क्लिक इतका मिळेल पगार अप्रेंटिस  किंवा लोडर (Apprentice or Loader)  - 20,384 रुपये सुपरवायजर (Supervisor) - 18,564 रुपये सीनियर सुपरवायजर  (Senior Supervisor) - 14,014 रुपये किती आहे शुल्क सामान्य, ओबीसी, महिला आणि माजी सैनिक यांच्यासाठी 750 / - (प्रत्येक अतिरिक्त पदासाठी अतिरिक्त 500 /-) एससी / एसटी, ईडब्ल्यूएस / पीएच - 450 /- (प्रत्येक अतिरिक्त पदासाठी रू. 300 /- अतिरिक्त) ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 30 जून 2021 आहे. सविस्तर माहितीसाठी आणि अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published: