मुंबई, 24 सप्टेंबर: सोशल मीडियामुळे संपर्क साधणं सोपं झालं; मात्र यामुळे फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ होते आहे. तरुणांना नोकरीचं आमिष दाखवून फसवणाऱ्या रॅकेटची सध्या सगळीकडे चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर आयटी कंपन्यांमधल्या फसवणुकीला तरुणांनी बळी पडू नये, यासाठी सरकारने मार्गदर्शक तत्त्वं जाहीर केली आहेत. काही दिवसांपूर्वी बनावट आयटी कंपनीनं 100हून अधिक तरुणांना नोकरीचं आमिष दाखवून म्यानमारमध्ये नेल्याची घटना उघड झाली होती. त्यापैकी 32 भारतीय नागरिकांची सरकारनं सुखरूप सुटका केली आहे. त्यामुळे अशा बनावट नोकऱ्यांच्या जाळ्यात तरुणांनी अडकू नये, यासाठी सरकारनं आवाहन केलं आहे. 'टीव्ही 9 हिंदी'ने याबाबत वृत्त दिलं आहे.
थायलंडमधल्या कंपन्यांमध्ये डिजिटल सेल्स अँड मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह या पदांसाठी भारतीय तरुणांना आकर्षक नोकरीचं आमिष दाखवलं जात असल्याबाबत थायलंड आणि म्यानमारमधल्या भारतीय दूतावासाला समजलं होतं. परराष्ट्र मंत्रालयानं त्याबाबत माहिती दिली आहे. हे बनावट नोकऱ्यांचं रॅकेट असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. कॉल सेंटरमधले घोटाळे व क्रिप्टोकरन्सी गैरव्यवहारामधल्या कथित आयटी कंपन्यांकडून हे रॅकेट चालवलं जात आहे. दर वर्षी लाखो तरुण परदेशात नोकरीसाठी जाण्यासाठी इच्छुक असतात. अशा तरुणांना या संघटना हेरतात व जाळ्यात अडकवतात.
रिटायर्ड आहात पण घरी कंटाळा येतो? मग राज्याच्या जलसंपदा विभागात नोकरीची संधी
अशा 100 तरुणांना बनावट कंपन्यांकडून म्यानमारमध्ये नेण्यात आलं आहे. त्यापैकी 32 नागरिकांची अधिकाऱ्यांनी सुटका केली आहे. या तरुणांना आयटी कंपनीत नोकरी देण्याच्या बहाण्यानं म्यानमारमधल्या दुर्गम प्रदेशात नेण्यात आलं होतं. आणखी 60 जणांची सुटका करण्यासाठी थायलंड आणि म्यानमार या देशांसोबत भारताची चर्चेतून कार्यवाही सुरू आहे. या नागिरकांना अवैध मार्गानं सीमापार नेण्यात आलं. अनेकांना म्यानमारमध्ये नेण्यात आलं. वाईट परिस्थितीत काम करण्यासाठी त्यांना कोंडून ठेवण्यात आलं.
10वी पास आहात ना? कम्प्युटरचं ज्ञानही आहे? IRCTC मुंबईत करतेय बंपर भरती
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career, Career opportunities, Job, Money fraud