मराठी बातम्या /बातम्या /करिअर /सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! बँकपासून, रेल्वेपर्यंत इथे करा लगेच अप्लाय; जाणून घ्या डिटेल्स

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! बँकपासून, रेल्वेपर्यंत इथे करा लगेच अप्लाय; जाणून घ्या डिटेल्स

विशेष म्हणजे, रेल्वेत दहावी पास तरुणांना नोकरी करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

विशेष म्हणजे, रेल्वेत दहावी पास तरुणांना नोकरी करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

विशेष म्हणजे, रेल्वेत दहावी पास तरुणांना नोकरी करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

  कोरोनाचा भारताच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेवरच मोठा परिणाम झाला. लॉकडाउनमध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अनेक जणांचा नोकरीसाठी शोध सुरू आहे. या बेरोजगार असलेल्या आणि सरकारी नोकरी करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी एक खुशखबर आहे. रेल्वे (Railway), बँक (Bank ) आणि आरोग्य मंत्रालयात (Ministry of Health) नोकर भरती संदर्भात जाहिरात प्रसिद्ध झाल्या आहेत. यासाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार यासाठी अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी अधिसूचना तपासून घ्यावी. विशेष म्हणजे, रेल्वेत दहावी पास तरुणांना नोकरी करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

  रेल्वे भरती 2021 (Railway Recruitment 2021)

  उत्तर मध्य रेल्वे, एनसीआर, प्रयागराज विभागाने अप्रेंटिसच्या पदांसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. तब्बल 1 हजार 664 पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 1 डिसेंबर 2021 आहे. 10 वी पास असलेले उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. मात्र, अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे.

  BOI Recruitment: बँक ऑफ इंडियामध्ये आठवी ते दहावी पास उमेदवारांसाठी भरती

  बँक भरती 2021 (Bank Recruitment 2021)

  जम्मू आणि काश्मीर बँकेने प्रोबेशनरी ऑफिसर आणि बँकिंग असोसिएट पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने केंद्रशासित प्रदेश-लडाखचे कायमस्वरूपी रहिवासी असणे गरजेचे आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2021 आहे. बँकेत अनेक पदांवर भरती प्रक्रिया सुरू केल्याने अनेक तरुणांना दिलासा मिळाला आहे.

  आरोग्य विभागात नोकरीची संधी (CHO Recruitment 2021)

  राष्ट्रीय आरोग्य अभियान, पश्चिम बंगाल आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्या अंतर्गत राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण समितीने आरोग्य अधिकारी पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या पदांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून अंतिम तारीख 15 नोव्हेंबर आहे. इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरू शकतात. उमेदवाराने अर्ज भरण्यापूर्वी सदर जाहिरातीत देण्यात आलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी.

  कोरोनामुळे अर्थव्यवस्था मंदावली असल्याने रोजगारनिर्मितीवर परिणाम होत आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आणि धंदे ठप्प झालेत. बेरोजगारीचं संकट आलं आहे. खासगी क्षेत्रातही नोकऱ्यांच्या संख्येत घट झाली आहे. आशात सरकारी नोकरी मिळवण्याची ही सुवर्ण संधी आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी वेळ न दवडता त्वरित सर्व माहिती बघावी आणि अर्ज करावा आणि भविष्य सुरक्षित करावं.

  First published:

  Tags: Career opportunities, जॉब