मुंबई, 12 जुलै: मुंबईच्या बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda Recruitment 2021) इथे लवकरच अधिकारी पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. बँक ऑफ बडोदा इथे प्रमुख (Head), उप. प्रमुख (Deputy Head) आणि उपाध्यक्ष (Vice President) पदासाठी भरती होणार आहे. तब्बल 08 जागांसाठी ही भरती होणार आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2021 असणार आहे.
या पदासाठी भरती
प्रमुख (Head)
उप. प्रमुख (Deputy Head)
उपाध्यक्ष (Vice President)
शैक्षणिक पात्रता
प्रमुख (Head) - पदवीधर आणि CA / CMA / MBA या पैकी एक पदवी असणं आवश्यक.
उप. प्रमुख (Deputy Head) - कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून पदवी आणि CA / MBA.या पैकी एक पदवी असणं आवश्यक.
उपाध्यक्ष (Vice President) - कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून पदवी आणि CA / CMA/CFA/ MBA.
हे वाचा - कोरोनातही IIT विद्यार्थी मालामाल;Microsoftकडून 10 विद्यार्थ्यांना 45.3 लाख पॅकेज
शुल्क
UR, EWS आणि OBC उमेदवारांसाठी 600/-रुपये शुल्क असणार आहे. तर SC, ST, PWD आणि महिलांसाठी 100/- रुपये शुल्क असणार आहे.
निवड प्रक्रिया
या भरतीसाठी उमेदवारांची टेस्ट घेण्यात येणार आहे. तसंच ग्रुप डिस्कशन आणि मुलाखतसुद्धा घेण्यात येणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 15 जुलै 2021
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी
इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी अप्लाय करण्यासाठी
इथे क्लिक करा. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.