मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Bank of Baroda Recruitment: बँक ऑफ बड़ौदा मुंबई इथे 15,000 रुपये पगाराची नोकरी; आजच करा अर्ज

Bank of Baroda Recruitment: बँक ऑफ बड़ौदा मुंबई इथे 15,000 रुपये पगाराची नोकरी; आजच करा अर्ज

अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 26 ऑक्टोबर: बँक ऑफ बड़ौदा मुंबई (Bank of Baroda Mumbai Jobs 2021) इथे लवकरच काही पदांसाठी पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Bank of Baroda Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. व्यवसाय प्रतिनिधी पर्यवेक्षक या पदांसाठी ही भरती होणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं किंवा दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

या पदांसाठी भरती

व्यवसाय प्रतिनिधी पर्यवेक्षक (Business Correspondent Supervisor) - एकूण जागा 04

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

व्यवसाय प्रतिनिधी पर्यवेक्षक (Business Correspondent Supervisor) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटीमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

तसंच कोणत्याही नॅशनल बँकेत काम करण्याचा किमान तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

ग्रामीण क्षेत्रातील बँकांमध्ये काम करण्याचा तीन वर्षांचा अनुभव असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

तरुण उमेदवारांना कम्प्युटरचं ज्ञान असणं आवश्यक आहे.

PCMC Recruitment: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत दहावी पास उमेदवारांसाठी मोठी संधी

वयोमर्यादा

वरिष्ठ उमेदवारांसाठी - उमेदवाराचं वय 64 वर्षांपेक्षा अधिक नसावं.

तरुण उमेदवारांसाठी - उमेदवाराचं वय 21 - 45 वर्षांच्या दरम्यान असावं.

इतका मिळणार पगार

व्यवसाय प्रतिनिधी पर्यवेक्षक (Business Correspondent Supervisor) - 15,000/- रुपये प्रतिमहिना + 10,000/- रुपयांपर्यंत variable components

अर्ज करण्यासाठीचा पत्ता

प्रादेशिक व्यवस्थापक, बँक ऑफ बड़ौदा, मुंबई मेट्रो उत्तर प्रदेश, तिसरा मजला, दीवान शॉपिंग सेंटरच्या मागे, जोगेश्वरी, पश्चिम मुंबई 400102

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 3 नोव्हेंबर 2021

JOB TITLEBank of Baroda Recruitment 2021
या पदांसाठी भरतीव्यवसाय प्रतिनिधी पर्यवेक्षक (Business Correspondent Supervisor) - एकूण जागा 04
शैक्षणिक पात्रता या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटीमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच कोणत्याही नॅशनल बँकेत काम करण्याचा किमान तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगार15,000/- रुपये प्रतिमहिना + 10,000/- रुपयांपर्यंत variable components
वयोमर्यादावरिष्ठ उमेदवारांसाठी - उमेदवाराचं वय 64 वर्षांपेक्षा अधिक नसावं. तरुण उमेदवारांसाठी - उमेदवाराचं वय 21 - 45 वर्षांच्या दरम्यान असावं.

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.bankofbaroda.in/या लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:

Tags: Career opportunities, जॉब