Government Job: 'या' बँकेत नोकरीची संधी; उद्यापासून करता येणार अर्ज

Government Job: 'या' बँकेत नोकरीची संधी; उद्यापासून करता येणार अर्ज

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2020 आहे. तर परीक्षेची तारीख डिसेंबर 2020/ जानेवारी 2021 असण्याचं सांगण्यात आलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. यूको बँकने (UCO Bank Recruitment 2020) स्केल-1 आणि स्केल-2 साठी स्पेशलिस्ट अधिकारी पदांबाबत व्हॅकेन्सीची माहिती दिली आहे. केली आहे. योग्य आणि इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाईटद्वारे https://www.ucobank.com ऑनलाईन अर्ज करू शकतात.

ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख - 27 ऑक्टोबर 2020

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 17 नोव्हेंबर 2020

परीक्षेची तारीख - डिसेंबर 2020/ जानेवारी 2021

असं डाउनलोड करा कॉल लेटर -

उमेदवारांना लेखी परीक्षा आणि इंटरव्ह्यूसाठी आपला रजिस्ट्रेशन नंबर, पासवर्ड आणि जन्म तारीख टाकून कॉल लेटर डाउनलोड करावं लागेल. पोस्टाद्वारे कोणतीही हार्ड कॉपी पाठवली जाणार नाही.

(वाचा - IBPS Clerk 2020: 2557 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू, या बँकांमध्ये नोकरीची संधी)

पदांची संख्या (Number of Posts) -

सिक्योरिटी ऑफिसर - 9

इंजीनियर - 8

इकोनॉमिस्ट - 2

स्टेटिस्टिशियन - 2

आयटी ऑफिसर - 20

चार्टर्ड अकाउंटेंट (JMGS-I) - 24

चार्टर्ड अकाउंटेंट (MMGS-II) - 25

एकूण - 93

(वाचा - Government job: Post Office मध्ये नोकरीची संधी; 69 हजारपर्यंत मिळेल वेतन)

ऍप्लिकेशन फी (Application Fees) -

जनरल, ईडब्ल्यूएस आणि ओबीसी उमेदवारांना एक हजार रुपये भरावे लागणार आहेत. तर एससी, एसटी आणि पीडब्ल्यूडी उमेदवारांना शंभर रुपये ऍप्लिकेशन फी भरावी लागणार आहे. अर्जदारांना ऑनलाईन पद्धतीने फी पेमेंट करावं लागणार आहे. ऑनलाईन पेमेंटशिवाय इतर कोणत्याही पद्धतीने पेमेंट स्वीकारलं जाणार नाही.

अधिकृत नोटिफिकेशन या लिंकवर क्लिक करा

(वाचा - 'या' संस्थेत सरकारी नोकरीची संधी; असा करा अर्ज)

Published by: Karishma Bhurke
First published: October 26, 2020, 5:32 PM IST
Tags:

ताज्या बातम्या