• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • अंगणवाडी भरती 2021; बाल विकास प्रकल्प जालनाकडून मोठी पदभरती; महिलांसाठी संधी

अंगणवाडी भरती 2021; बाल विकास प्रकल्प जालनाकडून मोठी पदभरती; महिलांसाठी संधी

बाल विकास प्रकल्प जालना भरती यांच्या वतीनं एकूण 18 रिक्त पदांची घोषणा करण्यात आली आहे.

 • Share this:
  जालना, 01 जुलै: बाल विकास प्रकल्प जालनाकडून (Bal Vikas Prakalp Jalna Recruitment 2021) पदभरतीची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे महिलांना यात नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. अंगणवाडी सेविका (Anganwadi Sevika) , मिनीसेविका (Mini Sevika) आणि मदतनीस (Helper) या पदांसाठी ही पदभरती असणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात अली आहे. पात्र उमेदवार दिलेल्या पत्त्याद्वारे आपला अर्ज ऑफलाइन सादर करू शकतात. बाल विकास प्रकल्प जालना भरती यांच्या वतीनं एकूण 18 रिक्त पदांची घोषणा करण्यात आली आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 9 जुलै 2021 आहे. या पदासाठी भरती अंगणवाडी सेविका मिनीसेविका मदतनीस एकूण जागा - 18 शैक्षणिक पात्रता या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या महिलांनी सातवी किंवा दहावी पास असणं आवश्यक आहे. अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. हे वाचा - Mahatransco Dhule Recruitment: इलेक्ट्रिकल अप्रेन्टिस पदासाठी भरती; आजच करा अर्ज वयोमर्यादा या पदभरतीसाठी वयवर्षे 21 ते 30 ही वयोमर्यादा असणार आहे. अर्ज पाठवण्याचा पत्ता एकात्मिक बाल विकास सेवा योजना पंचायत समिती कार्यालय, घनसावंगी अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख -  9 जुलै 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published: