मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Pune : नोकरी करत शिक्षण घ्यायचंय? पुणे विद्यापाठीत करा लगेच अर्ज

Pune : नोकरी करत शिक्षण घ्यायचंय? पुणे विद्यापाठीत करा लगेच अर्ज

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ( Savitribai Phule Pune University ) मुक्त व दूरस्थ अध्ययन प्रशाळेतर्फे शैक्षणिक अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ( Savitribai Phule Pune University ) मुक्त व दूरस्थ अध्ययन प्रशाळेतर्फे शैक्षणिक अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ( Savitribai Phule Pune University ) मुक्त व दूरस्थ अध्ययन प्रशाळेतर्फे शैक्षणिक अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत.

  पुणे 13 ऑगस्ट : ज्यांना नोकरी करत शिकण्याची इच्छा आहे अशा नोकरदारांना शिक्षण घेता यावे तसेच सर्व विद्यार्थ्यांना ज्यांना नियमित वर्गात येणे शक्य नाही अशांना शिक्षण घेताना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये. यासाठीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात  ( Savitribai Phule Pune University ) मुक्त व दूरस्थ अध्ययन प्रशाळेतर्फे शैक्षणिक अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत. याच मुक्त व दूरस्थ अध्ययन प्रशाळेच्या शैक्षणिक वर्ष 2022-23 च्या बी.ए ( BA Courses ) आणि बी.कॉम ( BCom Courses ) शाखेच्या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. चला तर या प्रवेश प्रक्रिया बद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया. कसा घेणार प्रवेश? बी.ए आणि बी.कॉम या मुक्त व दूरस्थ शिक्षण अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षासाठीची प्रवेश प्रक्रियाला सुरुवात झाली असून प्रशाळेच्या http://unipune.ac.in/SOL या संकेस्थळावर जाऊन विद्यार्थ्यांनी यासाठी ऑनलाईन नोंदणी करायची आहे. ऑनलाईन नोंदणीसाठी अंतिम तारीख 29 सप्टेंबर सायंकाळी 5 वाजेपर्यंत तर ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर सायंकाळी 5 पर्यंत आहे. भरलेल्या अर्जाची प्रिंट म्हणजेच प्रवेश अर्ज अभ्यास केंद्रांवर विद्यार्थ्यांनी 31 ऑक्टोबर 2022 सायंकाळी 5 वाजेपर्यंत भरायचे आहेत, अशी माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली आहे.

  हेही वाचा- Osmanabad : खेळण्या-बागडण्याच्या वयात कष्टाचे चटके; वडिलांचे छत्र हरवल्याने सुरू केला व्यवसाय

  अभ्यासक्रमासाठी प्रेवश घेण्यासाठी काय असेल पात्रता बी.ए आणि बी.कॉम या अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेण्यासाठी 12 उत्तीर्ण आवश्यक आहे. यासाठी कोणतीही किमान/ कमाल वय मर्यादा नाही. हा अभ्यासक्रम 3 वर्षाचा आहे. या साठी प्रवेश शुल्क हे ऑनलाईन पद्धतीने आकारण्यात येईल. प्रवेशासाठी हे लागणार कागदपत्रे  ऑनलाईन प्रवेश प्रकिया पूर्ण केल्यानंतर अभ्यास केंद्रावर प्रेवश अर्ज जमा करतेवेळी पुढील कागदपत्रे सादर करावे लागतील. 1)  प्रवेश अर्ज ( अभ्यास क्रम प्रत ) 2) प्रवेश अर्ज ( विद्यार्थी प्रत ) 3) आधार कार्ड ( मूळ प्रत झेरॉक्स ) 4) पात्र परीक्षेचे गुणपत्रक ( मूळ प्रत व झेरॉक्स ) 5) पुढील पैकी एक कागदपत्र ( जे लागू असेल ते ) 1) शाळा कनिष्ठ महाविद्यालयाचा दाखला ( मूळ प्रत ) 2) स्थलांतर प्रमाणपत्र  ( मूळ प्रत ) गुगल मॅप वरून साभार हेही वाचा- गरिबीला 'खो' देऊन बनला मुंबईचा कॅप्टन, पानटपरी चालकाच्या मुलाचं नशीबच बदललं! VIDEO चौकशी साठी पत्ता  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ गणेशखिंड रोड, गणेशखिंड, पुणे, महाराष्ट्र 411007 या पत्त्यावर जाऊन आपण संबंधित बी.ए आणि बी.कॉम या अभ्यासक्रमाबद्दल माहिती घेऊ शकता. अधिक माहितीसाठी http://www.unipune.ac.in/  विद्यापीठाच्या संकेत स्थळाला भेट देऊ शकता.
  First published:

  Tags: Education, Pune

  पुढील बातम्या