Home /News /career /

Interview Tips: जॉबची मुलाखत देताना 'या' 7 चुका कधीच करू नका; अन्यथा हातची जाईल नोकरी

Interview Tips: जॉबची मुलाखत देताना 'या' 7 चुका कधीच करू नका; अन्यथा हातची जाईल नोकरी

Job Interview tips

Job Interview tips

असे प्रश्न आपल्याला पडू नयेत यासाठी जॉब इंटरव्ह्यूसाठीचे काही अलिखित नियम (Unwritten Rules) आपण लक्षात ठेवले पाहिजेत. हफ पोस्टनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

  मुंबई, 21 मे:   सध्याच्या स्पर्धेच्या युगात चांगली नोकरी (Job) मिळवणं कठीण गोष्ट समजली जाते. इंटरव्ह्यू (Interview ) म्हणजे मुलाखत ही नोकरी मिळवण्याच्या प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाचा टप्पा असतो. तुम्ही मुलाखत कशी दिली, यावर नोकरी मिळेल की नाही हे अवलंबून असतं. नोकरीच्या मुलाखतीदरम्यान, तुमच्या शरीरात अॅड्रेनलिनची लेव्हल जास्त वाढलेली असते. त्यामुळे तुम्हाला आपोआप अस्वस्थ वाटू लागतं. अशा स्थितीमध्ये बहुतेकजण मुलाखतीदरम्यान चुका (Mistakes) करतात. परिणामी, आवश्यक ते ज्ञान (Knowledge) आणि कौशल्य (Skills) असूनही सिलेक्शन होत नाही. एक कँडिडेट म्हणून नोकरीची मुलाखत संपल्यानंतर जोपर्यंत समोरून काही प्रतिसाद मिळत नाही तोपर्यंत आपण अंधारात असल्यासारखं वाटतं. आपण मुलाखत चांगली दिली का? नेमणूक करणार्‍या व्‍यवस्‍थापकांवर आपलं काय इंप्रेशन पडलं? असे कितीतरी प्रश्न आपल्या मनात फिरत राहतात. असे प्रश्न आपल्याला पडू नयेत यासाठी जॉब इंटरव्ह्यूसाठीचे काही अलिखित नियम (Unwritten Rules) आपण लक्षात ठेवले पाहिजेत. हफ पोस्टनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. 1) बॉडी लँग्वेज अतिशय महत्त्वाची फाऊंड बाय इंक टॅलेंट एजन्सी आणि डिझाईन तज्ज्ञ असलेल्या एक्झिक्युटिव्ह सर्च फर्मच्या सीईओ लॉरा हंटिंग (Laura Hunting) यांच्या मते, उमेदवाराची बॉडी लँग्वेज (Body Language) ही त्याच्या शब्दांप्रमाणेच महत्त्वाची ठरू शकते. तुमच्या देहबोलीतून समोरच्या व्यक्तीला सिग्नल मिळतात. त्याचा तुमच्या इंटरव्ह्यूव रिझल्टवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही कसे बसता, हातांची हालचाल कशी आहे, चेहऱ्यावरील हावभाव कसे आहेत, आय कॉन्टॅक्ट कसा आहे या सर्व गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. लॉरा यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार, इंटरव्ह्यू देताना तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यांत बघितलं पाहिजे. ही अतिशय किरकोळ बाब आहे. पण, तिचे परिणाम नक्कीच मोठे आहेत. एकेकाळी Degree घेण्यासाठीही नव्हते पैसे; जिद्दीनं तिने मिळवली TVS कंपनीत नोकरी
  2) इंटरव्ह्यू घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची भूमिका समाजावून घ्या
  इंटरव्ह्यू घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची भूमिका समाजावून घेऊन त्यानुसार तयारी करणं, हा यशस्वी मुलाखतीचा सर्वोत्तम अलिखित नियम आहे, असं मोठ्या टेक कंपन्यांतील सीनिअर ह्युमन रिसोर्स (Human Resources) बिझनेस पार्टनर असलेल्या डॅनियल स्पेस (Daniel Space) यांनी म्हटलं आहे. समवयस्कानं मुलाखत घेणं आणि एखाद्या मॅनेजरनं मुलाखत घेणं यामध्ये फरक असतो. त्यांचे प्रश्न जरी सारखे असले तरी त्यांना अपेक्षित असलेली उत्तरं वेगळी असू शकतात. इंटरव्ह्यूवेळी ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. तुमची करिअर स्टोरी कशी सांगायची हे ठरवून इंटरव्ह्यूसाठी जाणं केव्हाही फायद्याचं ठरू शकतं. कधीकधी मुलाखतकारांना सांगण्यासाठी तुम्हाला एकापेक्षा जास्त गोष्टींची गरज भासू शकते. कारण, बहुतेकदा या लोकांनी तुमच्याबद्दल अंतर्गत चर्चा केलेली असते. टेक कंपनी लॅटिनक्स आणि ब्लॅक इंजिनिअरिंग टॅलेंटसाठी सोर्सर म्हणून काम करत असलेल्या शराई जॉन्सन (Sharai Johnson) यांच्या मते, उमेदवारांनी सोर्सर (Sourcer), रिक्रूटर (Recruiter) आणि हायरिंग मॅनेजर (Hiring Manager) यांच्यातील फरक समजून घेतला पाहिजे. सोर्सर प्रथम इंटरव्ह्यू शेड्यूल करतात, नंतर रिक्रूटरची एंट्री होते. रिक्रूटर नियुक्ती प्रक्रियेच्या शेवटपर्यंत उमेदवारांच्या संपर्कात असतो परंतु, अंतिम नियुक्तीचा निर्णय तो घेत नाही. सोर्सर आणि रिक्रूटर उमेदवाराच्या बाजूनं बोलू शकतात पण शेवटी नोकरी द्यायची की नाही हे हायरिंग मॅनेजरच्या निर्णयावर अवलंबून असतं. 3) तुमची योग्यता मोजक्या शब्दांमध्ये मांडा प्रोपल ऑन पर्पज कोचिंगच्या संस्थापक अॅनेलिस कॉर्डेरो(Anyelis Cordero) यांच्या म्हणण्यानुसार, बहुतेक वेळा जॉब कँडिडेट्सना स्वत:बद्दल आणि संबंधित कंपनीमध्ये काम करण्यासाठी का उत्सुक आहे, याबाबत विचारलं जातं. अशा वेळी अनेक उमेदवार आपल्या रिझ्युमेवरील माहिती वाचून दाखवतात. पण, असं करणं चुकीचं आहे. या प्रश्नांची उत्तरं देताना तुम्ही तुमची करिअर हिस्ट्री आणि तुमची योग्यता अगदी मोजक्या शब्दांमध्ये मांडली पाहिजे, अशी मुलाखतकारांची अपेक्षा असते. तुम्ही अनावश्यक तपशील सांगत बसलात तर तुम्ही निश्चितपणे समोरच्या व्यक्तीचा जास्त वेळ घ्याल. हार्वर्ड युनिव्हर्सिटीतील (Harvard University) करिअर सल्लागार आणि 'द अनस्पोकन रुल्स: सिक्रेट्स टू स्टार्टिंग युअर करिअर ऑफ राइट'चे लेखक गोरिक एनजी यांच्या मते, तुमची क्षमता, वचनबद्धता आणि सुसंगतता या गोष्टी तुमच्या जॉब सर्चमधून दिसतात. ही गोष्ट लक्षात घेऊन तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली पाहिजेत. 4) तुमच्याकडे एकापेक्षा जास्त करिअर स्टोरीज तयार असल्या पाहिजेत इंटरव्ह्यू घेणाऱ्या व्यक्तीसमोर तुम्हाला तुमची करिअर स्टोरी व्यवस्थित मांडता आली पाहिजे. तुम्हाला जर आणखी जास्त योग्य कँडिडेट बनायचं असेल तर तुमच्याकडे एकापेक्षा जास्त स्टोरीज पाहिजेत. डॅनियल स्पेस यांनी सांगितल्याप्रमाणं, तुमच्याकडे तीन किंवा चार सक्सेस स्टोरी असल्या पाहिजेत जेणेकरून तुम्ही मुलाखतकारांच्या पॅनेलला त्या सांगू शकता. तुम्ही पॅनेलमधील प्रत्येक व्यक्तीला नवीन स्टोरी सांगितल्यास तुमची योग्यता आणखी स्पष्टपणे नजरेस पडते. 5) फक्त थँक्यू नोटमुळे नोकरी मिळणार नाही इंटरव्ह्यु झाल्यानंतर इंटरव्ह्यु घेणाऱ्यांना थँक्यू नोट पाठवणं हा त्यांच्याशी नंतर संपर्कात राहण्याचा चांगला पर्याय आहे. तुमचा इंटरव्ह्यु जर पारंपरिक पद्धतीने झाला असेल तर अशी थँक्यू नोट पाठवली जातेच. पण जर तुमच्या मनात शंका असेल तर तुम्ही रिक्ट्रुटरला विचारून घ्या आणि जर चालणार असेल तर तुमचा इंटरव्ह्यु झाल्यावर ई-मेलद्वारे अशी थँक्यू नोट पाठवू शकता. 'हे समजून घ्या की यामुळं तुमच्या नियुक्तीवर फरक पडणार नाही. फक्त एक थँक्यू नोट पाठवून तुम्हाला नोकरी मिळेल, असा तुमचा समज असेल तर तो नक्कीच चुकीचा आहे,' असं डॅनियल स्पेस म्हणाले आहेत. या क्षेत्रांमध्ये नोकरी मिळाली तर Life Set; भरघोस पगार देणारे टॉप जॉब्स; वाचा 6) फॉलोअप घेत राहिल्यानं नोकरी मिळतेच असं नाही एखाद्या अतिशय चांगल्या गेलेल्या इंटरव्ह्यूनंतर तुम्हाला काहीही प्रतिसाद मिळाला नसेल तर वाईट वाटू शकतं. कदाचित इंटर्नल ब्युरोक्रसी (Internal Bureaucracy) किंवा इतर इंटरव्ह्यू घेतले जात असल्यामुळे उत्तर मिळण्यास उशीर होत असावा. याचा अर्थ असा होत नाही की, तुम्ही सतत फॉलोअप घेऊन समोरच्या व्यक्तींच्या नजरेत येण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर तुम्ही पाठपुरावा केला असेल आणि तरीही समोरून प्रतिसाद मिळत नसेल तर हा तुमच्यासाठी संकेत असू शकतो. संबंधित नोकरीसाठी तुमचा विचार केला जात नसल्याचा हा संकेत असू शकतो. गोरिक एनजी यांच्या मते, इंटरव्ह्यू दिलेल्या ठिकाणी सातत्यानं पाठपुरावा करण्यापेक्षा आणखी एखाद्या ठिकाणी अप्लाय केलेलं जास्त योग्य आहे. 7) संबंधित कंपनीतील कर्मचाऱ्यांशी चर्चा करा 25 वर्षांचा एक्झिक्युटिव्ह रिक्रूटिंगचा अनुभव असलेल्या करिअर स्ट्रॅटेजिस्ट बर्नाडेट पावलिक (Bernadette Pawlik) यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार, तुमच्या समवयस्कांशी न बोलता कधीही एखादी जॉब ऑफर घेऊ नका. तुम्ही ज्याठिकाणी काम करू इच्छित आहात त्या ठिकाणी अगोदरपासून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर तुम्हाला जास्त चांगली आणि वास्तविक माहिती मिळू शकते. तुमच्या नवीन बॉसला आणि तेथील मॅनेजमेंटला काय अपेक्षित आहे याचीही कल्पना मिळू शकते. वरील सात नियम लक्षात घेऊन तुम्ही इंटरव्ह्यू दिला तर नक्कीच तुम्हाला फायदा होऊ शकतो.
  First published:

  Tags: Career, Career opportunities, Job, Job alert

  पुढील बातम्या