• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • ASI ची मुलगी झाली IAS अधिकारी; देशात 6 व्या क्रमांकावर येऊन पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न

ASI ची मुलगी झाली IAS अधिकारी; देशात 6 व्या क्रमांकावर येऊन पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न

विशाखा एका मोठ्या कंपनीतील नोकरी सोडून गेल्या दोन वर्षांपासून UPSC ची तयारी करीत होती. यासाठी तिचे वडील तिचा आदर्श आहेत.

 • Share this:
  नवी दिल्ली, 4 ऑगस्ट : दिवस-रात्र अभ्यास करुन UPSC सारख्या अवघड परीक्षा पास करुन आज अनेक तरुणांचं सरकारी अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण झालं. अवघड अशा या परीक्षाचं सर्वांनाच आकर्षण असतं. मात्र मेहनत, व्यासंग आणि जिद्द असणारे काही थोडकेच ही परीक्षा पास करुन आपलं ध्येय गाठतात. दिल्ली पोलिसातील सहाय्यक सब इन्स्पेक्टर राजकुमार यादव यांची मुलगी विशाखा यादव IAS अधिकारी झाली आहे. विशेष म्हणजे तिने UPSE परीक्षेत 6 व्या क्रमांकावर आली आहे. तर मुलींमध्ये दुसरी आली आहे. याची माहिती मिळताच द्वारका जिल्ह्याअंतर्गत दिल्ली पोलिसात कार्यरत असलेल्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राजकुमार यादव यांना शुभेच्छा दिल्या. राजकुमार यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांतील सर्वजण आज खूप आनंदात आहेत. द्वारकाचे डीसीपी आणि अॅडिशनल डीसीपींसह अन्य जवान आणि कर्मचाऱ्यांनी ASI राजकुमार यादव यांच्या मुलीच्या यशासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. हे वाचा-UPSC 2019 Result अंतिम परीक्षेत महाराष्ट्राची नेहा भोसले देशात पंधरावी विशाखा यादव हिने यापूर्वी UPSC परीक्षेसाठी दोनदा प्रयत्न केला होता. मात्र यामध्ये ती प्रवेश प्रक्रिया पास करू शकली नव्हती. विशाखाने दिल्ली विद्यापीठातून BTech चं शिक्षण पूर्ण केलं आहे. शिक्षणानंतर ती दोन वर्षे एक मोठ्या कंपनीत चांगल्या पगारावर काम करीत होती. मात्र स्पर्धा परीक्षा हे स्वप्न असल्याने तिने मोठ्या पगाराची नोकरी सोडून पुन्हा परीक्षेची तयारी सुरू केली. आणि तिसऱ्या प्रयत्नात तिला यश मिळालं. विशाखाचे वडील दिल्ली पोलिसात असल्याने अधिकारी होण्याचा आदर्श तिला त्यांच्याकडूनच मिळाल्याने विशाखा सांगते.
  Published by:Meenal Gangurde
  First published: