तुम्हाला 'इस्रो'मध्ये काम करण्याची इच्छा आहे का? जाणून घ्या या संस्थेबद्दल

तुम्हाला 'इस्रो'मध्ये काम करण्याची इच्छा आहे का? जाणून घ्या या संस्थेबद्दल

इस्रोमध्ये काम करायला मिळणं ही वैज्ञानिकासाठी सन्मानाची गोष्ट असते. इथे काम केलेल्या इंजिनिअर्सनी त्यांचे अनुभव QUORA या वेबसाइटवर लिहिले आहेत.

  • Share this:

मुंबई, 11 सप्टेंबर : चांद्रयान -2 मोहिमेनंतर तरुणांमध्ये इस्रोबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. जगातल्या प्रमुख 5 अवकाश संशोधन संस्थांमध्ये इस्रोचा समावेश होतो. बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थेत प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांची इस्रो मध्ये वैज्ञानिक आणि इतर पदांवर नियुक्ती होते.

यासाठी प्रत्येकाचा सॅलरी पॅटर्न वेगळा असतो. इस्रो मध्ये जेव्हा नव्या वैज्ञानिकाची नियुक्ती होते तेव्हा त्याला केंद्र सरकारच्या सातव्या वेतन आयोगानुसार वेतन मिळतं. त्याचबरोबर सोयीसुविधा आणि भत्तेही मिळतात.

इस्रोमध्ये काम करायला मिळणं ही वैज्ञानिकासाठी सन्मानाची गोष्ट असते. इथे काम केलेल्या इंजिनिअर्सनी त्यांचे अनुभव QUORA या वेबसाइटवर आपले अनुभव लिहिले आहेत. इस्रोमध्ये काम करणारी अरित्रा म्हणते, इस्रोमध्ये अनेक विभाग एकत्र काम करत असतात. नव्याने नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्याला याची कल्पनाही नसते.पण या संस्थेचा प्रचंड पसारा जाणून घेतला की मग काम करणं सोपं होतं.

उत्तम वर्क कल्चर

इस्रोच्या कार्यालयीन कामाची वेळ सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत असते पण जेव्हा एखादी मोहीम हाती घेतली जाते तेव्हा सगळेच जण झपाटल्यासारखे काम करतात. इथे 5 दिवसांचा आठवडा असतो आणि 2 दिवसांची सुटी असते. इस्रोच्या ऑफिसमध्ये मोबाइल घेऊन जाण्याची परवानगी नसते. इथे असं कोणतंही काम नाही की तुम्हाला वर्क फ्रॉम होम पद्धतीने करता येईल. त्यामुळे सगळं काम संस्थेत येऊनच केलं जातं.

इस्रोमधलं वर्क कल्चर वाखाणण्याजोगं आहे, असं एक तरुण वैज्ञानिक साबरी श्रीकुमारने लिहिलं आहे. तुम्हाला बुद्धिमान लोकांसोबत काम करायची संधी मिळते, असंही तो लिहितो.जेव्हा नव्या नियुक्त्या होतात तेव्हा कर्मचाऱ्यांना खास प्रशिक्षण दिलं जातं. त्यामुळे या संस्थेचं काम समजून घ्यायला मदत होते.

=======================================================================================

SPECIAL REPORT : 'आरे'तील कारशेडला शिवसेनेचा 'ना रे'!

Published by: Arti Kulkarni
First published: September 11, 2019, 8:09 PM IST
Tags: careerisro

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading