मराठी बातम्या /बातम्या /करिअर /पार्ट टाईम काम करून मिळवा बक्कळ पैसा; पाहा कसा आणि कुठे करायचा अर्ज

पार्ट टाईम काम करून मिळवा बक्कळ पैसा; पाहा कसा आणि कुठे करायचा अर्ज

कष्टाची तयारी आणि काही किमान कौशल्ये असतील तर अशी काही कामे उपलब्ध आहेत ज्याद्वारे चांगले पैसे कमावता येतात. जे लोक अर्धवेळ काम करू इच्छितात तेदेखील अशी कामे करून चांगली कमाई करू शकतात.

कष्टाची तयारी आणि काही किमान कौशल्ये असतील तर अशी काही कामे उपलब्ध आहेत ज्याद्वारे चांगले पैसे कमावता येतात. जे लोक अर्धवेळ काम करू इच्छितात तेदेखील अशी कामे करून चांगली कमाई करू शकतात.

कष्टाची तयारी आणि काही किमान कौशल्ये असतील तर अशी काही कामे उपलब्ध आहेत ज्याद्वारे चांगले पैसे कमावता येतात. जे लोक अर्धवेळ काम करू इच्छितात तेदेखील अशी कामे करून चांगली कमाई करू शकतात.

नवी दिल्ली 07 जून : सध्याच्या कोरोना साथीमुळे (Coronavirus Pandemic) देशभरात करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे (Lockdown) अनेक उद्योग धंदे बंद पडले. त्यामुळं अनेकजण बेरोजगार झाले आहेत. अनेकांचे स्वतःचे छोटे मोठे व्यवसायही बंद झाले. अशा परिस्थितीत आज अनेकांना उदरनिर्वाहासाठी अर्थार्जन करण्याची गरज असून त्यासाठी अनेकजण काहीना काही कामाच्या शोधात आहेत. या परिस्थितीत कष्टाची तयारी आणि काही किमान कौशल्ये असतील तर अशी काही कामे उपलब्ध आहेत ज्याद्वारे चांगले पैसे कमावता येतात. जे लोक अर्धवेळ काम करू इच्छितात तेदेखील अशी कामे करून चांगली कमाई करू शकतात. यापैकीच एक काम आहे ते म्हणजे स्विगी डिलिव्हरी बॉयचे (Swiggy Delivery Boy).

टीव्ही 9 हिंदी डॉट कॉमनं दिलेल्या वृत्तानुसार, लॉकडाउनच्या काळात हॉटेल्स, रेस्टॉरंटसमध्ये बसून भोजन करण्यासाठी बंदी असली तरी पार्सल सेवा सुरू आहे. त्यामुळं घरबसल्या फूड ऑर्डर करणाऱ्या लोकांना सेवा देणाऱ्या ऑनलाइन फूड कंपन्यांना तसंच अनेक आउटलेटसना डिलिव्हरी बॉइजची मोठ्या प्रमाणात गरज भासते. त्यामुळं सध्या हे काम करण्याची मोठी संधी उपलब्ध आहे. स्विगीनंही ही संधी दिली आहे.

विद्यार्थ्यांकडून नाविन्यपूर्ण Ladies toilet ची निर्मिती, वाचा काय आहे विशेष

केवळ दहावी पास असलेली आणि दुचाकी (Two Wheeler) चालवू शकणारी परवानाधारक व्यक्ती हे काम करू शकते. यासाठी कोणतीही मुलाखत किंवा परीक्षाही द्यावी लागत नाही. दिवसातला थोडावेळ या कामासाठी देऊनही चांगले उत्पन्न मिळवता येते.

झोप लागताच दिसतो मृत्यू; कोरोनाच्या संकटात रहस्यमयी आजाराची दहशत

यासाठी वाहनाची गरज असते, मात्र हे काम करू इच्छिणाऱ्या व्यक्तीकडे स्वतःची बाईक नसल्यास स्विगी बाईक घेण्यासही मदत करते. स्विगीतर्फे डिलिव्हरी बॉईजना स्वस्त दरात बाईक मिळवून देण्याची योजनाही राबवली जाते. त्यामुळं ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड, अँड्रॉइड स्मार्टफोन, बँक खातं असलेली कोणतीही व्यक्ती हे काम करू शकते. हे काम करायचे असेल तर स्विगीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा किंवा स्विगीची अनेक भरती केंद्रंही आहेत, तिथं जाऊन अर्ज केल्यास दुसर्‍या दिवसापासूनच हे काम सुरू करता येईल.

स्विगी डिलिव्हरी बॉयला दर आठवड्याला (weekly) पगार मिळतो. किती डिलिव्हरीज पोहोचवल्या यानुसार कमिशन दिले जातं. याशिवाय दरदिवशी, आठवड्यात आणि महिन्यात केलेल्या कामानुसार इन्सेन्टिव्हही (Incentives) दिला जातो. अनेकदा लोक टीप (Tip) देतात. कंपनीही वेगवेगळ्या प्रकारचा भत्ता देते. जास्त काम केल्यास जास्त पैसे मिळतात. त्यामुळं महिन्याला 20 हजार रुपयांपर्यंत कमाई करता येते. स्विगीतर्फे सुमारे सहा लाख रुपयांचा वैद्यकीय आणि अपघात विमादेखील दिला जातो.

First published:

Tags: Job, Swiggy