मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Apple Salary: Apple कंपनी भारतातील कर्मचाऱ्यांना नक्की किती देते पगार? आकडा बघून तुम्हीही व्हाल थक्क

Apple Salary: Apple कंपनी भारतातील कर्मचाऱ्यांना नक्की किती देते पगार? आकडा बघून तुम्हीही व्हाल थक्क

आपल्या भारतातील कर्मचाऱ्यांना नक्की किती पगार (Apple India Salary) देते हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

आपल्या भारतातील कर्मचाऱ्यांना नक्की किती पगार (Apple India Salary) देते हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

आपल्या भारतातील कर्मचाऱ्यांना नक्की किती पगार (Apple India Salary) देते हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई , 30 नोव्हेंबर: जगभरातील काही मोठमोठ्या कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना लाखो रुपये पगार (Salary of Top company employees) देतात हे आपण आजपर्यंत ऐकत आलोय. अगदी Google, Facebook, Twitter, Apple, Microsoft अशा कंपन्या आपल्या जगभरातील कर्मचाऱ्यांना भरघोस पगार (Salary of top International Firms) देतात. म्हणूनच भारतातील अनेक उमेदवारांना अशा मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरी करण्याची इच्छा असते. या कंपन्यांमध्ये नक्की किती पगार (salary of IT employees) दिला जातो, त्यासह इतर कोणत्या सोयी-सुविधा दिल्या जातात? याबाबत कुतूहल अनेकांना असतं. टेकगिग या वृत्तसंस्थेनं apple कंपनीबाबत हे माहिती दिली आहे. Apple कंपनी (How much salary Apple give to employee) आपल्या भारतातील कर्मचाऱ्यांना नक्की किती पगार (Apple India Salary) देते हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

भारतात Apple आपल्या इंजिनिअर्सना आणि डेव्हलपर्सना सरासरी किती पगार देते याचा विचार केला असेल तर Apple आपल्या कर्मचार्‍यांना सरासरी किती वेतन देते हे आज या माध्यमातून जाणून घेऊया.

एका अहवालानुसार, कॅलिफोर्नियातील एका अभियंत्याला सर्वाधिक एकूण पगार देण्यात आला ज्याने 3,50,000 डॉलर्स कमावले. संशोधनानुसार, सर्वात कमी सरासरी वेतन 1,06,500 डॉलर्स इतके होते. मात्र भारतातील कर्मचाऱ्यांना Apple नक्की किती पगार देते हे बघूया.

धक्कादायक! 'या' IT कंपन्यांवर आली संक्रांत; दर 5 पैकी 1 कर्मचारी देतोय राजीनामा

भारतात, सरासरी Apple सॉफ्टवेअर Engineer चं उत्पन्न एक वर्षापेक्षा कमी अनुभव असलेल्या व्यक्तींसाठी 9 लाख आहे तर एक वर्षापेक्षा जास्त अनुभव असलेल्यांसाठी 26.5 लाख आहे. Appleच्या सॉफ्टवेअर इंजिनिअरसाठी Compensation तब्बल 12.6 लाख ते 51 लाखांपर्यंत आहे. पगाराचा अंदाज Apple कर्मचाऱ्यांनी सादर केलेल्या 70 पगारांवर आधारित आहे.

Apple मधील Vice President ला वर्षाला INR 61.4 लाख पगारासह सर्वाधिक पगार मिळतो. काही 10% कर्मचारी वर्षाला INR 40.18 लाखांपेक्षा जास्त कमावतात. तर सर्वात श्रीमंत 1% लोक दरवर्षी तब्बल 102 लाखांपेक्षा जास्त कमावतात.

Apple लवकरच लाँच करणार Electric car

सध्या भारतासह जगभरात इलेक्ट्रिक वाहनांची फार क्रेझ पाहायला मिळत आहे. कारण ग्राहक सध्याच्या काळातील बिघडत्या समतोलामुळं चांगलेच जागरूक झालेले आहेत. त्यामुळं ही मागणी वाढत असल्याचं बोललं जात आहे. Tesla आणि Revian यांसारख्या कंपन्यांचे मार्केट प्राइज वाढताना दिसत आहे. त्यामुळे आता या स्पर्धेत उतरत Apple ही 2025 पर्यंत Electric car लाँच करणार आहे.

First published:

Tags: Apple, Career, Salary