मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

कोणताही क्लास न लावता महिला झाली IAS; UPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिल्या खास टीप्स

कोणताही क्लास न लावता महिला झाली IAS; UPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिल्या खास टीप्स

परीक्षेत कोणताही क्लास न लावता यशस्वी होण्याची किमया करून दाखवली आहे अनुकृती शर्मा (Anukruti Sharma) हिनं. विशेष म्हणजे अनुकृतीनं लग्नानंतर ही परीक्षा दिली आहे.

परीक्षेत कोणताही क्लास न लावता यशस्वी होण्याची किमया करून दाखवली आहे अनुकृती शर्मा (Anukruti Sharma) हिनं. विशेष म्हणजे अनुकृतीनं लग्नानंतर ही परीक्षा दिली आहे.

परीक्षेत कोणताही क्लास न लावता यशस्वी होण्याची किमया करून दाखवली आहे अनुकृती शर्मा (Anukruti Sharma) हिनं. विशेष म्हणजे अनुकृतीनं लग्नानंतर ही परीक्षा दिली आहे.

मुंबई 27 मे: भारतीय प्रशासन सेवेत उच्च अधिकारी म्हणजे आयएएस अधिकारी (IAS-Indian Administration Services) होण्याचं ध्येय बाळगणारी असंख्य मुलं-मुली अगदी बहुतेक कॉलेज शिक्षणापासूनच यूपीएससी (UPSC) म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या तयारीला लागतात. यासाठी विशेष कोचिंग क्लास (Coaching Class0 लावले जातात. आजकाल तर अगदी दिल्लीत जाऊन विशेष कोचिंग क्लासमध्ये जाऊन याची तयारी केली जाते. तरीही पहिल्याच फटक्यात यात यश मिळण्याची हमी नसते. अशा या अत्यंत अवघड मानल्या जाणाऱ्या परीक्षेत कोणताही क्लास न लावता यशस्वी होण्याची किमया करून दाखवली आहे अनुकृती शर्मा (Anukruti Sharma) हिनं. विशेष म्हणजे अनुकृतीनं लग्नानंतर ही परीक्षा दिली आहे.

लग्नानंतर (Marriage) स्त्रिया करिअर (Carrier) आणि अभ्यास (Study) यापासून दूर जातात. नवीन जबाबदाऱ्या, नवीन लोक या सगळ्या परिस्थितीमुळे अनेकदा अनेक महिलांचे लग्नानंतर शिक्षण थांबतेच. त्यामुळं लग्नानंतर करिअर करणाऱ्या महिलांची संख्या फार कमी असते. मात्र अनुकृती शर्मा हिनं आपल्या कामगिरीनं लग्नानंतरही आयएएस ऑफिसरसारख्या अवघड क्षेत्रात करिअर घडवता येते, हे सिद्ध केलं आहे. यामुळं असंख्य महिलांना तिनं प्रेरणा दिली आहे.

JEE Advanced प्रवेश परीक्षेसंदर्भात मोठी अपडेट

अनुकृति शर्मा हिनं लग्नानंतर यूपीएससीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. मात्र या परीक्षेच्या तयारीसाठी तिनं कोणताही कोचिंग क्लास किंवा टेस्ट सिरीज दिली नाही. अर्थात यामुळे तिचा हा प्रवास थोडा दीर्घकाळाचा होता; पण धीर न सोडता तिनं प्रयत्न सुरूच ठेवले आणि अखेर आपलं उद्दिष्ट्य गाठलंच.

2019 मध्ये 138 वा क्रमांक मिळवून झाली उत्तीर्ण: अनुकृति शर्मा 2019 मध्ये 138 वा क्रमांक मिळवून युपीएससीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाली; पण त्याआधी 2017 मध्येही तिनं या परीक्षेचे तीन टप्पे पार करून 355 वा क्रमांक मिळवला होता. मात्र अधिक वरचा क्रमांक मिळवण्याच्या उद्देशानं तिनं पुन्हा परीक्षा द्यायची ठरवली. पण ती लगेच 2018 मध्ये न देता एक वर्षाचा ब्रेक घेऊन तिनं ती 2019 मध्ये दिली. या वर्षाच्या काळात तिनं आणखी कसून तयारी केली आणि पुढच्या क्रमांकानं तिनं परीक्षा उत्तीर्ण केली.

CBSE 12th Exam Pattarn : बारावी बोर्डाची परीक्षा ऑफलाइनच! असा असेल बदललेला पॅटर्न

अशी केली परीक्षेची तयारी : कोणताही क्लास न लावता अनुकृतीनं आपला अभ्यास कसा केला याबद्दल सर्वांनाच कुतूहल आहे. त्याबाबत सांगताना ती म्हणाली की, तिने ऑनलाइन माध्यमातून (Online) या परीक्षेचा अभ्यास केला. कोणत्याही विषयावर काही वाचायचे असेल तर ती इंटरनेटची (Internet) मदत घेत असे. इंटरनेटवर सर्व प्रकारची माहिती उपलब्ध आहे, ज्याच्या मदतीनं आपण सर्व विषयांची तयारी करू शकता असा तिचा विश्वास आहे. त्यामुळं तिनं स्व-अभ्यासाच्या बळावरच ही परीक्षा दिली.

अभ्यासाच्या टिप्स : या परीक्षेबाबत अनुकृतीनं काही टिप्स (Tips) दिल्या आहेत. ज्या या परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. या परीक्षेत प्रश्नामध्ये जे विचारलं गेलं आहे, त्याचंच उत्तर दिलं पाहिजे. असा सल्ला तिनं दिला आहे. ज्या गोष्टी आवश्यक नाहीत त्या उत्तरामध्ये अजिबात लिहू नका. फ्लो चार्ट, आकृत्या यांचा वापर करणं आवश्यक आहे. यामुळे चांगले गुण मिळण्यात खूप मदत होते. उत्तर लिहिल्यानंतर त्याची पडताळणी करण्यास विसरू नका. यामुळं आपल्याला आपली चूक लक्षात येते आणि ती सुधारण्याची संधी मिळते.

First published:

Tags: Success stories, Upsc, Upsc exam