Home /News /career /

मुंबई IIT मधील प्रवेशासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेणाऱ्या विद्यार्थ्याला यश

मुंबई IIT मधील प्रवेशासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेणाऱ्या विद्यार्थ्याला यश

जेईई अॅडव्हान्स परीक्षेत (JEE Advance Exam) देशात 270 वा क्रमांक मिळवणाऱ्या सिद्धांत बत्राने (Sidhhant Batra) मुंबई आयआयटीमध्ये प्रवेश घेण्यासाठी थेट सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावलं.

नवी दिल्ली, 11 डिसेंबर : ऑनलाइन प्रवेश प्रकियेदरम्यान केवळ चुकीच्या लिंकवर क्लिक केल्यानं जेईई अॅडव्हान्स परीक्षेत (JEE Advance Exam) देशात 270 वा क्रमांक मिळवणाऱ्या सिद्धांत बत्रानं (Sidhhant Batra) मुंबई आयआयटीतील (IIT Mumbai) प्रवेश गमावला; मात्र त्याला आता सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court) दिलासा दिला आहे. सिद्धांतला इंजिनीअरिंग अभ्यासक्रमाला (Engineering Faculty) अंतरिम प्रवेश देण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयानं मुंबई आयआयटीला दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती संजय किशन कौल, न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी, न्यायमूर्ती ऋषीकेश रॉय यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. सिद्धांत बत्रा याच्या वतीनं प्रल्हाद परांजपे यांनी बाजू मांडली. त्यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरत या खंडपीठानं, सिध्दांत बत्रा याला इंजिनीअरिंग अभ्यासक्रमाला अंतरिम प्रवेश देण्याचा आदेश आयआयटी मुंबईला दिला. त्याचवेळी आयआयटी मुंबईला नोटीस जारी केली आणि या याचिकेवरील पुढील सुनावणी लवकरच होईल, असंही सांगितलं. सिद्धांत बत्रा याचा प्रवेश सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन असेल, असं यावेळी त्याचे वकील प्रल्हाद परांजपे यांनी सांगितलं. इलेक्ट्रॉनिक इंजिनीअरिंग अभ्यासक्रमाची सीट गमावली आग्रा इथला रहिवासी असलेल्या सिद्धांत बत्रा यानं मुंबई आयआयटीमध्ये इलेक्ट्रॉनिक इंजिनीअरिंग (Electronic Engineering) अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन अर्ज भरताना चुकून आपला प्रवेश रद्द करावा असा संदेश देणाऱ्या बटणावर क्लिक केलं. हे वाचा - 'या' वर्गातील विद्यार्थ्यांना यापुढे होमवर्क नाही; नवीन शैक्षणिक धोरणातील निर्णय खरंतर त्याला आपली सीट आरक्षित करायची होती, पण यामुळं त्याला मुंबई आयआयटीमध्ये प्रवेश नाकारण्यात आला. मुंबई उच्च न्यायालयात याचिका त्यावर सिद्धांत बत्रा यानं मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) याचिका दाखल केली. आपल्याकडून गडबडीत चूक झाली असून, मानवाधिकाराच्या (Human Rights) दृष्टीनं विचार करून आयआयटीला त्याला प्रवेश देण्याचे आदेश द्यावेत अशी विनंती त्यानं याचिकेत केली होती. एक सीट वाढवण्याचीही विनंती त्यानं केली होती. प्रतिकूल परिस्थितीत मिळवलं जेईईत यश सिद्धांतच्या आई वडिलांचे निधन झालं असून, तो त्याच्या आजोबांकडे राहतो. सिद्धांतचे वडील तो लहान असतानाच मरण पावले. त्याच्या आईने त्याला वाढवले पण 2018 मध्ये तिचेही निधन झाले. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यानं आयआयटी जेईई परीक्षा उत्तीर्ण केली आहे. याचा विचार करून त्याला प्रवेश देण्याचे आदेश न्यायालयानं आयआयटीला द्यावेत अशी मागणी त्यानं याचिकेत केली होती. सर्व जागा भरल्या या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयानं सर्व अभ्यासक्रमांच्या जागा भरल्या गेल्या असल्यानं आता न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही. प्रवेशासाठीच्या नियमांचं पालन बंधनकारक आहे, असं सांगत त्याची याचिका फेटाळली होती. पुढच्या वर्षी सिद्धांत पुन्हा प्रवेशासाठी अर्ज करू शकतो, असंही न्यायालयानं म्हटलं होतं. तसंच मुंबई आयआयटीला आदेश दिले होते की, सिद्धांतच्या विनंतीचा विचार करून योग्य व्यवस्था करावी. मात्र त्यावर आयआयटीनं हे शक्य नसल्याचं सांगितलं. हे वाचा - JEE Main 2021: परीक्षापद्धतीत 'हे' बदल करण्याचे शिक्षणमंत्र्यांचे संकेत त्यामुळं 23 नोव्हेंबर रोजी सुनावणी करताना उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं, आयआयटीनं त्यांच्या अर्जावर विचार करून आदेश दिला होता, असं सांगून याचिका पुन्हा फेटाळली होती. अखेर सिद्धांतने सर्वोच्च न्यायालयाकडे धाव घेतली. त्यात त्याचा विजय झाला असून त्याला अंतरिम प्रवेश मिळणार आहे.
Published by:Priya Lad
First published:

Tags: IIT, Mumbai, Student, Supreme court

पुढील बातम्या