महिलांनो, अंगणवाडी सेविकांसाठी होणार पदभरती; तारीख निघून जाण्याआधी करा अप्लाय

पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे.

पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे.

  • Share this:
    अमरावती, 22 जून: महिलांना अधिक सक्षम बनवण्यासाठी अंगणवाडीमध्ये (Anganwadi jobs 2021) नोकरी उत्तम आहे. शिक्षण कमी झालेल्या मात्र व्यवहार ज्ञान असेल्या महिलांसाठी आता अमरावती अंगणवाडीमध्ये (Amravati Anganwadi bharti 2021) पदभरती होणार आहे. बाल विकास प्रकल्प अधिकारी, नवीन नागरी प्रकल्प अमरावती अंतर्गत पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. या जागांसाठी पदभरती   एकूण जागा - 24 अंगणवाडी सेविका मदतनीस हे वाचा -नोकरीची सर्वात मोठी संधी! MAHATRANSCO मध्ये तब्बल 8500 जागांसाठी होणार पदभरती शैक्षणिक पात्रता अंगणवाडी सेविका - या पदासाठी किमान दहावी पास असणं आवश्यक आहे. मदतनीस - या पदासाठी सातवीपर्यंत शिक्षण असणं आवश्यक आहे. असे करा अर्ज अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर फॉर्म पाठवून अर्ज करायचा आहे. कार्यालयाचा पत्ता – बाल विकास प्रकल्प अधिकारी, नागरी प्रकल्प अचलपूर, दर्या, वरुड, मोर्शी दत्त पॅलेस, कोल्हटकर बिल्डींग, गांधी चौक, अमरावती – 444601 अर्ज सुरु होण्याची तारीख – 18 जून 2021 अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 जुलै 2021 सविस्तर नोटिफिकेशन वाचण्यासाठी आणि डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published: