Home /News /career /

Amazonच्या नव्या CEOची मोठी घोषणा! जगभरातील 55,000 लोकांना जॉब देणार कंपनी; लवकरच सुरु होणार जॉब फेअर

Amazonच्या नव्या CEOची मोठी घोषणा! जगभरातील 55,000 लोकांना जॉब देणार कंपनी; लवकरच सुरु होणार जॉब फेअर

Amazon कंपनी जगभरातील तब्बल 55,000 उमेदवारांना नोकरी (Amazon Job Fair 2021) देणार आहे

    संपूर्ण जगात प्रसिद्ध असलेली सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी (e-commerce Company)  Amazon (e-commerce Company Amazon)  चे  नवे CEO अँडी जेसी (Amazon CEO Andy Jessy) यांनी सर्वात मोठी घोषणा केली आहे. यंदा Amazon कंपनी जगभरातील तब्बल 55,000 उमेदवारांना नोकरी (Amazon Job Fair 2021) देणार आहे. लवकरच जॉब फेअर (Amazon Jobs Announcement) सुरू करण्यात येणार आहे अशीही घोषणा अँडी यांनी केली आहे. यासंबंधीचं वृत्त 'टीव्हीनाइन हिंदी' नं प्रकाशित केलं आहे. अँडी जेसी यांनी एक पत्रकार परिषद घेतली आहे आणि त्यात त्यांनी ही घोषणा केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, येत्या काही महिन्यांत जागतिक स्तरावर कॉर्पोरेट आणि तंत्रज्ञानाशी संबंधित कामांसाठी 55,000 लोकांना कामावर घेण्याचं नियोजन आहे. तसंच कंपनीला किरकोळ, क्लाउड आणि जाहिरातींसह मागणीसह इतर व्यवसायांशी संपर्क साधण्यासाठी अधिक लोकांची आवश्यकता आहे. साथीच्या काळात बर्‍याच नोकऱ्या बदलल्या आहेत आणि असे बरेच लोक आहेत जे थोडी वेगळी आणि नवीन नोकरी शोधत आहेत. अशा लोकांसाठी आम्ही Amazon हे प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देत आहोत जेणेकरून त्यांना कंपनीमध्ये काम करण्याची संधी मिळू शकेल. कंपनीच्या म्हणणयप्रमाणे यंदा काम्पोआणिआपल्या जगभरातील कर्मचाऱ्यांच्या संख्येत तब्बल 20 वाढ करणार आहे. तसंच तंत्रज्ञानाशी निगडित हे नवीन जॉब्स असल्यामुळे Amazon ला आपली कार्यपद्धती अधिक सक्षम करण्यातही मदत मिळणार आहे. हे वाचा - Interview Tips: Why Should We Hire You? असं द्या प्रश्नाचं Perfect उत्तर या पदांसाठी होऊ शकते भरती अमेझॉन ज्या पदांची भरती करत आहे त्यात इंजिनीअरिंग (Engineering Jobs), रिसर्च सायन्स (Research Science)आणि रोबोटिक्स (Robotics) (Amazon Hiring Process) समाविष्ट आहेत. तसंच गेल्या वर्षी म्हणजेच 2020 मध्ये Amazon नं तब्बल 5 लाख उमेदवारांना नोकरी दिली होती या नोकऱ्या डिलिव्हरी बॉय आणि इतर पदांशी निगडित होत्या. Amazon चं जॉब फेअर येत्या 15 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. त्यामुळे नोकरी मिळवण्याची ही मोठी संधी आहे. कंपनी जगभरात सामान डिलिव्हरी करण्यासाठी आणि खरेदीदारांची मागणी पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गोदाम बांधण्यासाठी पैसे खर्च करणार आहे. तसंच कामगारांना आकर्षित करण्यासाठी वेतन वाढवणार आहे.यासाठी कंपनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करणार आहे.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    पुढील बातम्या