जगातील सर्वात मोठी e- commere कंपनी देणार 1 लाख नोकऱ्या : 12 वी पास असणाऱ्यांना मोठी संधी

अमेझॉन कंपनीने या वर्षीच्या सुरुवातीला देखील जगभरात 1 लाख 75हजार लोकांना कामावर घेतलं होतं.

अमेझॉन कंपनीने या वर्षीच्या सुरुवातीला देखील जगभरात 1 लाख 75हजार लोकांना कामावर घेतलं होतं.

  • Share this:
    नवी दिल्ली, 14 सप्टेंबर : जगातील सर्वात मोठी e-commerce कंपनी एक लाख लोकांना नोकरी देणार आहे. सोमवारी अमेझॉनने याविषयी घोषणा केली. Amazon.com ने याविषयी माहिती देताना सांगितलं की, लवकरच ऑनलाईन ऑर्डरच्या वितरणावर कंपनी नव्याने काम करणार असून 1 लाख लोकांसाठी रोजगार देखील निर्माण करणार आहे.' Amazon ने जाहीर केलेल्या माहितीनुसार, 'या वितरणाच्या कामासाठी बारावी उत्तीर्ण असणं एवढीच पात्रता पुरेशी आहे. यामध्ये पार्ट टाइम आणि फुल टाइम कामासाठी भरती होणार असून पॅकिंग, शिपिंग आणि सॉर्टिंग विभागात ही नोकरभरती केली जाणार आहे.' अमेझॉन कंपनीने या वर्षीच्या सुरुवातीला देखील 1 लाख 75हजार लोकांना कामावर घेतलं होतं. याविषयी अधिक माहिती देताना कंपनीने सांगितलं की, त्यांना 100 नवीन वेअरहाऊस आणि अन्य कामांसाठी माणसांची गरज आहे. या वेअर हाऊसचं काम पाहणाऱ्या एलिसिया बोलर डेविस यांनी याविषयी सांगितले कि, अमेझॉन काही शहरांमध्ये 1,000 डॉलर साइन इन बोनस देखील देत आहे. त्यांच्या मते डेट्रॉइट, न्यूयॉर्क, फिलाडेल्फिया आणि लुइविले, केंटकीमध्ये कामगार मिळणं खूप अवघड आहे. अमेझॉनमध्ये सुरुवाती वेतन हे 15 डॉलर प्रतितास इतकं आहे. मागील आठवड्यातच अमेझॉनने घोषणा केली होती की, त्यांना कॉर्पोरेट आणि तांत्रिक कामांसाठी 33,000 कामगारांची गरज आहे. अमेझॉनने एप्रिल ते जूनच्या दरम्यान विक्रमी कमाई केली असून कोरोनाच्या या संकटात अनेकांनी ऑनलाईन किराणा ऑर्डर केल्यामुळे त्यांना याचा मोठा फायदा झाला आहे. अमेझॉनच्या वेअरहाऊसमध्ये अनेक गोष्टी या अस्तव्यस्त पडलेल्या असतात. त्यामुळे हे सामान व्यवस्थित ठेवण्यासाठी आणि त्याचे योग्य नियोजन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कामगारांची गरज आहे. हॉलिडे शॉपिंग आणि सेलच्या दिवसांमध्ये अमेझॉनच्या मोठ्या प्रमाणात ऑर्डर मिळतात. त्यामुळे या दिवशी कोणतीही गडबड न होण्यासाठी त्यांनी आधीपासूनच तयारी सुरु केली आहे. त्यामुळेच नवीन 1 लाख लोकांची भरती करण्याची तयारी अमेझॉनने सुरु केली आहे.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published: