• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • AIIMS Recruitment: AIIMS नागपूर इथे 25,000 रुपये कमावण्याची मोठी संधी; या पदासाठी आजच करा अप्लाय

AIIMS Recruitment: AIIMS नागपूर इथे 25,000 रुपये कमावण्याची मोठी संधी; या पदासाठी आजच करा अप्लाय

मुलाखतीची तारीख 27 सप्टेंबर 2021 असणार आहे.

 • Share this:
  नागपूर, 23 सप्टेंबर: ऑल इंडिया इन्स्टिटयूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये (All India Institute of Medical Sciences Nagpur) लवकरच भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (AIIMS Nagpur Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. नैतिकता समिती समन्वयक या पदासाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 27 सप्टेंबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती नैतिकता समिती समन्वयक (Ethics Committee Coordinator) AIIMS Nagpur Recruitment 2021
  AIIMS Nagpur Recruitment 2021
  शैक्षणिक पात्रता आणि अनुभव नैतिकता समिती समन्वयक (Ethics Committee Coordinator) - B.Sc/B.Pharm आणि क्लिनिकल रिसर्चमध्ये पदव्युत्तर शिक्षण आवश्यक. क्लिनिकल रिसर्च असोसिएट म्हणून अनुभव आवश्यक. इतका मिळणार पगार नैतिकता समिती समन्वयक (Ethics Committee Coordinator) - 25,000/- रुपये प्रतिमहिना मुलाखतीचा पत्ता फार्माकोलॉजी विभाग, कॉलेज इमारत (तिसरा मजला) एम्स, नागपूर.
  JOB ALERT  AIIMS Nagpur Recruitment 2021
  या पदांसाठी भरती  नैतिकता समिती समन्वयक (Ethics Committee Coordinator)
  शैक्षणिक पात्रता  B.Sc/B.Pharm आणि क्लिनिकल रिसर्चमध्ये पदव्युत्तर शिक्षण
  इतका मिळणार पगार  25,000/- रुपये प्रतिमहिना
  मुलाखतीचा पत्ता   फार्माकोलॉजी विभाग, कॉलेज इमारत (तिसरा मजला) एम्स, नागपूर.
  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://aiimsnagpur.edu.in/recruitment_notices या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 85,000 रुपये पगाराची नोकरी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत (Kalyan Dombivli Municipal Corporation) विविध पदांच्या तब्बल 26 जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Kalyan Dombivli Municipal Corporation Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे.  सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, केंद्र प्रमुख कम गुणवत्ता व्यवस्थापक, वरिष्ठ तंत्रज्ञ, कनिष्ठ तंत्रज्ञ या पदांसाठी ही भरती (KDMC Recruitment 2021) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत आणि थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे.  अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2021 असणार आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत पदभरतीबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा. ECHS पॉलीक्लिनिक मुंबई शिपाई पदासाठी भरती ECHS पॉलीक्लिनिक मुंबई (ECHS Polyclinic Mumbai recruitment 2021) मध्ये 8वी पास असलेल्यांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (ECHS Mumbai Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. शिपाई या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑक्टोबर 2021 असणार आहे. ECHS पॉलीक्लिनिक या पदभरतीबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published: