• Home
  • »
  • News
  • »
  • career
  • »
  • AISSEE 2022: सैनिक शाळा प्रवेश परीक्षेच्या अर्जप्रक्रियेला सुरुवात

AISSEE 2022: सैनिक शाळा प्रवेश परीक्षेच्या अर्जप्रक्रियेला सुरुवात

AISSEE 2022

AISSEE 2022

अखिल भारतीय सैनिक शाळा प्रवेश परीक्षा 2022 (AISSEE) साठी अर्ज जारी केले आहेत. इयत्ता ६ वी आणि ९ वी मध्ये प्रवेशासाठी इच्छुक आणि पात्र विद्यार्थी अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज सादर करू शकतात.

  • Share this:
नवी दिल्ली : लष्करात जाऊन देशसेवा करण्याचं स्वप्न बघणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांसाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. देशातील सैनिकी शाळांमध्ये (Sainik School) 2022-23 या शैक्षणिक वर्षाकरिता प्रवेश प्रक्रिया (Admission Process) सुरू झालेली आहे. अखिल भारतीय सैनिकी शाळा प्रवेश परीक्षेसाठी (AISSEE 2022) अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने ६ वी आणि ९ वीच्या प्रवेशासाठी अखिल भारतीय सैनिक शाळा प्रवेश परीक्षा 2022 (AISSEE) साठी अर्ज जारी केले आहेत. इयत्ता 6 वी आणि 9  वी मध्ये प्रवेशासाठी इच्छुक आणि पात्र विद्यार्थी अधिकृत वेबसाइट aissee.nta.nic.in वर ऑनलाइन अर्ज सादर करू शकतात. सैनिकी शाळा प्रवेश परीक्षा 2022 (The Sainik School Entrance Exam - 2022 - AISSEE) 9 जानेवारी 2022 रोजी राष्ट्रीय चाचणी एजन्सीव्दारे आयोजित केली जाईल. याकरिता अधिकृत वेबसाइटवर जाऊन पालक अर्ज दाखल करू शकतात. उमेदवार AISSEE 2022 साठी केवळ aissee.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करू शकतात. विद्यार्थ्यांनी हे लक्षात घ्यावे की केवळ ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज स्वीकारले जाणार आहेत. सैनिकी शाळेत इयत्ता 6 वीत प्रवेश घेणाऱ्यांसाठी प्रवेश परीक्षेची (Entrance Exam) वेळ दुपारी 2 ते 4.30 वाजेदरम्यान असेल. इयत्ता 9वीत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी प्रवेश परीक्षेची वेळ दुपारी 2 ते 5 अशी असेल. दरम्यान कोरोनाबाधित (Corona) रुग्णांच्या संख्येत घट झाल्यानं महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारने राज्यभरातील सर्व शाळा सुरु करण्याचा विचार सुरू केला आहे. तसंच अनेक राज्यांनी महाविद्यालयं सुरु केली असून, ज्यांनी लसीचे (Vaccine) दोन्ही डोस घेतले आहेत, अशा व्यक्तींनाच कॅम्पसमध्ये येण्यास परवानगी दिली जात आहे. देशभरातील 33 सैनिकी शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया यापूर्वी सुरू झाली असून इच्छुक पालकांनी तातडीने प्रवेश परीक्षा प्रक्रियेसाठी अर्ज दाखल करावेत असे आवाहन करण्यात आले आहे.

सैनिकी शाळेत प्रवेशासाठी या आहेत महत्त्वाच्या तारखा

- ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात - 27 सप्टेंबर 2021 - अर्जाचे शुल्क भरण्याची अंतिम मुदत – 26 ऑक्टोबर 2021 - दुरुस्ती करण्यासाठी कालावधी – 28 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2021 - प्रवेश परीक्षा – 9 जानेवारी 2022
First published: