मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

भारतीय हवाई दलात भरती व्हायची संधी; परीक्षेसाठी असा करा अर्ज

भारतीय हवाई दलात भरती व्हायची संधी; परीक्षेसाठी असा करा अर्ज

भारतीय एअर फोर्सच्या (IAF) फ्राइंग ब्रँच आणि ग्राउंड ड्युटी पदांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाला आहे.  कॉमन ॲडमिशन टेस्टची  (AFCAT) अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे.

    नवी दिल्ली :  भारतीय हवाई दलाने (Indian Air Force) आपल्या अधिकृत afcat.cdac.in  या वेबसाईटवरुन  फ्लाईंग ब्रँच आणि ग्राऊंड ड्युटीकरीता कॉमन ॲडमिशन टेस्टसाठी (AFCAT) अधिसूचना जारी केली आहे. आयएएफ एएफसीएटी 2021 साठीची नोंदणी प्रक्रिया 1 डिसेंबरपासून सुरू झाली असून, या करिता अर्ज करण्याची अंतिम मुदत 30 डिसेंबर 2020 पर्यंत आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज दाखल करावेत असे आवाहन करण्यात आले आहे. भारतीय हवाई दलात सेवा बजावू इच्छिणाऱ्यांसाठी ही परीक्षा महत्वाची आहे. मात्र त्यासाठी इच्छुक उमेदवारांनी तातडीने अर्ज दाखल करणे आवश्यक आहे. भारतीय वायूसेना देशाच्या सीमांचं सरंक्षण करते. देशभरातील तरुण-तरुणी एक सन्मानजनक, स्थिर आणि चांगला पगार देणाऱ्या करिअरच्या शोधात असतात. ते सर्व त्यांना या करिअरमध्ये मिळू शकतं त्याचबरोबर देशाची सेवा करण्याची संधीही मिळते. त्यामुळे अधिकाधिक भारतीय तरुण-तरुणींनी या संधीचा विचार करायला हवा. आयएएफच्या फ्लाईंग ब्रँच आणि पर्मनंट कमिशन (पीसी) शॉर्ट सर्व्हिस कमिशन (एसएससी) आणि ग्राउंड ड्युटी (टेक्निकल) मधील शॉर्ट सर्व्हिस कमिशन (एसएससी) या अभ्यासक्रमांच्या जानेवारी 2022 मधील प्रवेशासाठी हे अर्ज मागविण्यात आले आहेत. आयएएफ एएफसीएटी 2021 साठी ऑनलाईन अर्ज असा भरा -   आयएएफ एएफसीएटी 2021 या परीक्षेसासाठी afcat.cdac.in  या अधिकृत वेबसाइटवर जावे. -    होम पेजवरील लॉग इन टॅबवर जाऊन AFCAT 01/2021 – cycle वर क्लिक करावे. -    नव्या पेजवर जाताच रजिस्ट्रेशनवर क्लिक करावे. -    त्यावर सर्व माहिती भरावी. -    रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रजिस्टर असलेल्या संपर्क क्रमांकावर रजिस्टर असलेला लॉगइन आयडी आणि पासवर्ड पाठवला जाईल. -    त्यानंतर आयएएफ एएफसीएटी परीक्षेसाठीचा अर्ज दिसेल. तो अर्ज संपूर्ण भरुन सबमिट करावा. -    त्यानंतर आयएएफ एएफसीएटी 2021 परीक्षेसाठी असलेली अॅप्लिकेशन फी भरावी. -    त्यानंतर आयएएफ एएफसीएटी 2021 परीक्षेच्या फॉर्मची कॉपी डाऊनलोड करावी.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    पुढील बातम्या