अहमदनगर,14 जुलै: अहमदनगरच्या अंगणवाडीमध्ये (Ahmednagar Anganwadi Recruitment 2021) लवकरच पदभरती होणार आहे. यासाथची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. महिलांना या पदभरतीमध्ये रोजगाराची (jobs for Women) मोठी साधी उपलब्ध होऊ शकणार आहे. अंगणवाडी सेविका/ मिनी सेविका आणि मदतनीस अशा जागांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑनलाईन अर्ज पाठवायचे आहेत. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 29 जुलै 2021 असणार आहे.
या पदांसाठी भरती
अंगणवाडी सेविका (Anganwadi Worker)
मिनी सेविका (Mini Worker)
मदतनीस (Helper)
शैक्षणिक पात्रता
या पदभरतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता सातवी ते दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच स्थानिक महिलांना या भरतीमध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे. सविस्तर माहितीसाठी जाहिरात बघणं आवश्यक आहे.
हे वाचा - UPSC मध्ये यश मिळवायचंय? पाच वर्षं अपयश सोसलेल्या अभिजित यादवचे अनुभव वाचाच
अर्ज पाठवण्याचा पत्ता
एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय पारनेर, पंचायत समिती पारनेर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. पिन – 414302
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 29 जुलै 2021
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career opportunities, Jobs