Home /News /career /

Agnipath Scheme: 'अग्निवीर' व्हायचंय? मग किती पुल अप्स आवश्यक? अशी होईल Physical Test

Agnipath Scheme: 'अग्निवीर' व्हायचंय? मग किती पुल अप्स आवश्यक? अशी होईल Physical Test

कोणत्या प्रकारची आणि कशी फिझिकल टेस्ट द्यावी

कोणत्या प्रकारची आणि कशी फिझिकल टेस्ट द्यावी

आज आम्ही तुम्हाला अग्निवीर म्हणून भरती व्हायचं असेल तर कोणत्या प्रकारची आणि कशी फिझिकल टेस्ट द्यावी लागेल याबद्दलची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.

    मुंबई, 20 जून: भारतीय सैन्याने अग्निपथ योजनेअंतर्गत अग्निवीर भर्ती रॅली 2022 (Agniveer Army Bharti Rally 2022) ची अधिसूचना जारी केली आहे. अग्निवीर भरती रॅलीसाठी ऑनलाइन नोंदणी जुलैमध्ये सुरू होईल, असे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. सैन्यात अग्निवीर होण्यासाठी उमेदवारांना पूर्वीप्रमाणेच शारीरिक ( physical fitness test), वैद्यकीय (agniveer medical test) आणि लेखी परीक्षा उत्तीर्ण करावी लागते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अग्निवीर म्हणून भरती व्हायचं असेल तर कोणत्या प्रकारची आणि कशी फिझिकल टेस्ट द्यावी लागेल याबद्दलची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. धावण्याची शर्यत 1.6 किलोमीटर धावणं आवश्यक असेल. गट I – 5 मिनिटे 30 सेकंदमध्ये पूर्ण केल्यास – 60 गुण मिळणार गट II - 5 मिनिटे 31 सेकंद ते 5 मिनिटे 45 सेकंदमध्ये पूर्ण केल्यास - 48 गुण मिळणार Agnipath Recruitment:10वी, 12वीत इतके मार्क्स आहेत ना? तरच अग्निवीर म्हणून सैन्यात होता येईल भरती बीम (पुल अप) आणि पॉइंट्स 10 बीम पुल अप केल्यास - 40 गुण मिळणार 9 बीम पुल अप केल्यास - 33 गुण मिळणार 8 बीम पुल अप केल्यास - 27 गुण मिळणार 7 बीम पुल अप केल्यास - 21 गुण मिळणार 6 बीम पुल अप केल्यास - 16 गुण मिळणार अग्निवीर भरती रॅली 2022 मध्ये, उमेदवारांना नऊ फूट लांब उडी आणि झिगझॅग बॅलन्सिंगसह धावणे आवश्यक आहे. तसंच इतरही काही टेस्ट घेण्यात येणार आहेत. वैद्यकीय चाचणी रॅलीच्या ठिकाणी विहित वैद्यकीय मानकांनुसार वैद्यकीय चाचणी होईल. अपात्र आढळलेल्या उमेदवारांना तज्ज्ञांच्या पुनरावलोकनासाठी लष्करी रुग्णालयात पाठवले जाईल. उमेदवारांना रेफरलच्या पाच दिवसांच्या आत संदर्भित लष्करी रुग्णालयात अहवाल द्यावा लागेल आणि 14 दिवसांच्या आत रुग्णालयाद्वारे पुनरावलोकन वैद्यकीय चाचणी केली जाईल. Agnipath Scheme: प्रचंड गदारोळातही अखेर अग्निपथ योजनेचं नोटीफिकेशन जारी; या तारखेपासून सुरू होईल नोंदणी अजित डोभाल यांचं समर्थन या योजनेचं समर्थन करत नॅशनल सेक्युरिटी ऍडव्हायझर NSA अजित डोभाल यांनी एक मोठं विधान केलं आहे. मुलाखतीत त्यांनी अग्निपथ योजनेवर अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. ते म्हणाले की, भारतात आजूबाजूचे वातावरण बदलत आहे. काल आपण जे करत होतो, तेच भविष्यातही करत राहिलो तर आपण सुरक्षित राहूच असे नाही. उद्याची तयारी करायची असेल तर बदलावे लागेल. त्यामुळे ही योजना येणं आवश्यक आहे.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Indian army, Indian navy, Job, Job alert

    पुढील बातम्या