मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Agnipath Recruitment:10वी, 12वीत इतके मार्क्स आहेत ना? तरच अग्निवीर म्हणून सैन्यात होता येईल भरती

Agnipath Recruitment:10वी, 12वीत इतके मार्क्स आहेत ना? तरच अग्निवीर म्हणून सैन्यात होता येईल भरती

अग्निवीर म्हणून सामील होण्यासाठी नक्की एलिजिबिलिटी काय?

अग्निवीर म्हणून सामील होण्यासाठी नक्की एलिजिबिलिटी काय?

आज आम्ही तुम्हाला यासाठीची भरती प्रक्रिया आणि दहावी आणि बारावीत नक्की किती मार्क्स असणं आवश्यक आहे हे सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 20 जून: केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेबाबत (Agnipath scheme) मोठा गदारोळ झाला आहे. विद्यार्थ्यांच्या विरोधानंतर सरकारने भारतीय सैन्यदलाचे भवितव्य डोळ्यासमोर ठेवून या योजनेत अनेक मोठे बदल (What is Agnipath scheme?) केले आहेत. दरम्यान, रविवारी तिन्ही लष्करांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली आणि त्यात अग्निपथ योजनेची सविस्तर माहिती (detail information about Agnipath scheme) देण्यात आली. पत्रकार परिषदेत लष्कर, नौदल आणि हवाई दलातील भरती प्रक्रियेबाबतही माहिती देण्यात आली आहे. विरोधाला न जुमानता सरकारनं अग्निपथ योजनेंतर्गत भरतीसाठी अधिसूचना (Official Notifcation of Agnipath scheme 2022) अखेर जारी केली आहे.

मात्र भारतीय सैन्यात अग्निवीर म्हणून सामील होण्यासाठी नक्की एलिजिबिलिटी काय? दहावी आणि बारावीत नक्की किती मार्क्स असणं आवश्यक आहे? असे प्रश्न विद्यार्थ्यांना पडले आहेत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला यासाठीची भरती प्रक्रिया आणि दहावी आणि बारावीत नक्की किती मार्क्स असणं आवश्यक आहे हे सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

Agnipath Scheme: "उद्याची तयारी करायची असेल तर बदलावं लागेल"; NSA अजित डोभाल यांचं मोठं विधान

अग्निपथ योजनेद्वारे, अग्निवीर जनरल ड्यूटी (GD), तांत्रिक (एव्हिएशन/अ‍ॅम्युनिशन), लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल, ट्रेडसमन 10वी पास आणि ट्रेडसमन 8वी उत्तीर्ण यांची सैन्यात भरती केली जाणार आहे.

काय असेल एलिजिबिलिटी

अग्निवीर (जीडी) – किमान 45% गुणांसह 10वी उत्तीर्ण. प्रत्येक विषयात किमान ३३% गुण असणे आवश्यक आहे.

अग्निवीर तांत्रिक - विज्ञान शाखेतून 12वी उत्तीर्ण (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित) किमान 50% गुणांसह. प्रत्येक विषयात किमान ४० टक्के गुण असणे आवश्यक आहे.

अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल – किमान ६०% गुणांसह १२वी पास. प्रत्येक विषयात किमान 50% गुण असणे आवश्यक आहे.

अग्निवीर ट्रेडसमन 10वी पास – 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

अग्निवीर ट्रेडसमन 8वी पास – 8वी पास.

Agnipath Scheme: प्रचंड गदारोळातही अखेर अग्निपथ योजनेचं नोटीफिकेशन जारी; या तारखेपासून सुरू होईल नोंदणी

अजित डोभाल यांचं समर्थन

या योजनेचं समर्थन करत नॅशनल सेक्युरिटी ऍडव्हायझर NSA अजित डोभाल यांनी एक मोठं विधान केलं आहे. मुलाखतीत त्यांनी अग्निपथ योजनेवर अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. ते म्हणाले की, भारतात आजूबाजूचे वातावरण बदलत आहे. काल आपण जे करत होतो, तेच भविष्यातही करत राहिलो तर आपण सुरक्षित राहूच असे नाही. उद्याची तयारी करायची असेल तर बदलावे लागेल. त्यामुळे ही योजना येणं आवश्यक आहे.

First published:

Tags: Education, Indian army, Job, Job alert, Jobs Exams