अफशाची देदीप्यमान कामगिरी! खाटीक समाजातील पहिली महिला पायलट होण्याचा पटकवला मान

अफशाची देदीप्यमान कामगिरी! खाटीक समाजातील पहिली महिला पायलट होण्याचा पटकवला मान

अफशाच्या या कामगिरीबद्दल भाईंदरसह देशभरात कौतुकाचा वर्षावर होत आहे.

  • Share this:

भाईंदर, 30 डिसेंबर : आजच्या घडीला महिला सर्वच क्षेत्रात आपलं पाऊस यशस्वीपणे ठेवत आहेत. मिळालेल्या संधीचं सोनं करत आहेत. याच पार्श्वभूमीवर मुस्लीम बांधवांची आणि संपूर्ण खाटीक समाजाची मान अभिमानानं उंचावणारी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. खाटीक, कसाई, कुरेशी बांधवांना अभिमान वाटेल अशी कामगिरी या तरुणीनं केली आहे.

मुंबईतील भाईंदर इथली रहिवासी असलेल्या फारूक इस्माइल कुरेशी यांची कन्या अफशा या तरुणीनं अमेरिकेतून वैमानिकाचं प्रशिक्षण पूर्ण केलं आहे. अफशानं इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनियरिंगची पदवी घेतली आहे. त्यानंतर कमर्शियल पायलट लायसन्सचा कोर्स अमेरिकेतून पूर्ण करून वैमानिक होण्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे.

हे वाचा--45 डिग्री तापमानात अंडं आणि नूडल्सची झाली ही अवस्था, पाहा या आश्चर्यकार PHOTOS

अफशाच्या या कामगिरीबद्दल भाईंदरसह देशभरात कौतुकाचा वर्षावर होत आहे. अफशाच्या या यशस्वी कामगिरीबद्दल जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. अफशाने अमेरिकेत आपला कोर्स पूर्ण केल्यानंतर तिला चांगली नोकरी करण्याची संधी मिळत होती मात्र ती संधी नाकारून मायभूमीत येण्याचा निर्णय घेतला आणि आता इथे वैमानिक म्हणून संधीचं सोनं कऱण्याचा निर्णय अफशानं घेतला आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: December 30, 2020, 2:03 PM IST
Tags: career

ताज्या बातम्या