भुवनेश्वर, 10 जानेवारी : ओडिसामधून एक अनोखी घटना समोर आली आहे. येथील परिवहन विभागाने (odisha transport department) एक सरकारी बसच्या वेळेत यासाठी बदल केली कारण एका विद्यार्थ्याला वेळेत शाळेत पोहोचता यावं. परिवहन विभागाने घेतलेल्या या निर्णयाचं खूप कौतुक केलं जात आहे. सर्वसाधारणपणे लोक बसनुसार आपल्या वेळेत बदल करतात. मात्र असं पहिल्यांदा झालं आहे की एका विद्यार्थ्यासाठी सरकारने बसच्या वेळेत बदल केला.
विद्यार्थ्याने ट्विटरवर केली होती तक्रार
भुवनेश्वर एमबीएस पब्लिक शाळेतील साई अन्वेश अमृतम प्रधान नावाच्या एका विद्यार्थ्याने राज्य परिवहन विभागाच्या ट्विटर अकाऊंटवरुन एक संदेश लिहिला. यामध्ये त्यानं लिहिलं की, शाळेत रिपोर्टिंगची वेळ सकाळी 7.30 ची आहे. मात्र रूट क्रमांक 13 वर पहिली बस लिगींपूरीहू सकाळी 7.40 वाजता निघते. साईने पुढे लिहिलं की, यामुळे त्याला खूप त्रास सहन करावा लागत आहे. यावर काही कारवाई केली तर खूप मदत होईल.
विद्यार्थ्याच्या ट्विटनंतर परिवहन विभागाने तातडीने केली मदत
विद्यार्थ्याच्या ट्विटनंतर काही तासातं बादराजधानी भागातील शहरी परिवहन भुवनेशव्र (CRUT) आणि याचे प्रबंध निर्देशक IPS अधिकारी अरुण बोथरा यांनी लिहिलं की, प्रिय साई...ही बस तुमच्यासारख्या प्रवाशांमुळे चालते..सोमवारपासून आम्ही बसच्या वेळेत बदल करीत आहोत. आता पहिली बस सकाळी 7.00 वाजता जाईल आणि तुला शाळेत जायला उशीर होणार नाही. विभागाने घेतलेल्या या निर्णयाचं सर्वत्र कौतुक होत आहे.
ओडिसामध्ये 9 महिन्यांनंतर शाळा झाल्या सुरू
तब्बल 9 महिन्यांनंतर शुक्रवारी ओडिसात शाळा कोरोनाच्या नियमांचं पालन करीत सुरू झाल्या. 10 वी, 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी 100 दिवसांचं शिक्षण लक्ष्य पूर्ण करण्यासाठी तयारी केली आहे. शाळेत वावरताना कोरोनाचे नियम पाळणे अनिवार्य आहे.