• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • मोठी बातमी! 'या' तारखेला राज्यात कॉलेजेस सुरु होण्याची शक्यता; उच्च शिक्षणमंत्र्यांची माहिती

मोठी बातमी! 'या' तारखेला राज्यात कॉलेजेस सुरु होण्याची शक्यता; उच्च शिक्षणमंत्र्यांची माहिती

कॉलेज सुरु करण्यासंबंधी महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे.

 • Share this:
  मुंबई, 05 ऑगस्ट: राज्यात दहावी आणि बारावीचे निकाल (10th 12th Result Maharashtra board) लागल्यानंतर आता प्रवेशाची लगबग सुरु झाली आहे. त्यात राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत (Minister Uday Samant) यांनी पत्रकार परिषदेत सांगितल्याप्रमाणे आजपासून राज्यात प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. तसंच काल उदय सामंत यांच्याकडून राज्यात कॉलेज सुरु (Colleges opening date in Maharashtra) करण्यासंदर्भात घोषणा करण्यात आली होती. पुढील शैक्षणिक वर्ष सुरु करण्यासोबतच कॉलेजसही सुरु होणार अशी घोषणा त्यांनी केली होती. त्यानुसार आज कॉलेज सुरु करण्यासंबंधी महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. राज्यात सगळीकडे हळूहळू कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यात अनलॉकचा निर्णयही घेण्यात आला आहे. म्हणूनच आता येतं शैक्षणिक वर्ष (Academic year starts soon) लवकरच सुरु करण्यात येणार आहे अशी माहिती उदय सामंत यांनी दिली होती. तसंच या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कॉलेजमध्ये (Colleges reopening in Maharashtra) बोलवण्यात येणार आहे अशीही माहिती त्यांनी दिली हाती. याच पार्श्वभूमीवर आता सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये कॉलेजेस पुन्हा सुरु करण्यात येणार आहेत. "येत्या 15 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरदरम्यान राज्यात पुन्हा कॉलेज सुरु करण्याचा आमचा प्रयत्न आहे, मात्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी कॉलेज सुरु होतील असं नाही. त्या भागातील कोरोनची स्थिती काय आहे यावर हा निर्णय घेतला जाईल. तसंच नवीन शैक्षणिक वर्ष कसं असावं याबाबतचा अहवाल आमच्याकडे 15 दिवसांत येईल त्यानंतर त्यासंबंधीची माहिती दिली जाईल" असं उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी म्हंटलं आहे. काल कुलगुरू यांची बैठक झाली. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यातील कोरोनच्या स्थितीचा आढावा घेतला जाईल आणि त्यानंतरच कॉलेज सुरु करण्याचा निर्णय घेतला जाईल. संचालक आणि जिल्हाधिकारी यांनी याबद्दल आढावा घ्यावा, असंही उदयास अमानत यांनी म्हंटल आहे.
  Published by:Atharva Mahankal
  First published: