मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Inspiring Story: NRI पतीनं तिला सोडलं, खचून न जाता तिनं जिद्दीनं मिळवलं यश, झाली IAS

Inspiring Story: NRI पतीनं तिला सोडलं, खचून न जाता तिनं जिद्दीनं मिळवलं यश, झाली IAS

या तरुणीनं कमालीच्या धैर्यानं संकटाला सामोरं जात UPSC परीक्षेत यश मिळवलं आहे. IAS झालेल्या कोमल गणात्राची प्रेरणादायी गोष्ट

या तरुणीनं कमालीच्या धैर्यानं संकटाला सामोरं जात UPSC परीक्षेत यश मिळवलं आहे. IAS झालेल्या कोमल गणात्राची प्रेरणादायी गोष्ट

या तरुणीनं कमालीच्या धैर्यानं संकटाला सामोरं जात UPSC परीक्षेत यश मिळवलं आहे. IAS झालेल्या कोमल गणात्राची प्रेरणादायी गोष्ट

  • Published by:  News18 Desk

अहमदाबाद, 15 जानेवारी : आयुष्यात जोडीदार (partner) सोडून गेल्यावर अनेकजण कमालीचे मोडून पडताना आपण अनेकदा पाहतो. विशेषतः स्त्रिया पतीनं सोडल्यावर आयुष्याचा अर्थच हरवल्यासारख्या जगतात. इथे मात्र एक कमालीचं प्रेरणादायी (inspirational) वास्तव समोर आलं आहे.

कोमल गणात्रा या महिलेबाबत ही घटना घडली आहे. कोमल युपीएससीची (UPSC) कठीण परीक्षा पास होत आयएएस (IAS) झाली आहे. मात्र तिच्या आयएएस बनण्यामागची कहाणी अतिशय लक्षणीय आणि संघर्षमय आहे. कोमलला लग्नानंतर (marriage) अवघ्या 15 दिवसात तिच्या पतीनं (husband) सोडलं. मात्र डगमगून न जाता उलट अधिक जिद्दीनं ती जगायला लागली. शिवाय मनाशी निर्धार करत तिनं हे डोळे दीपवणारं यश मिळवलं.

कोमल म्हणतात, 'एका स्त्रीचं आयुष्य केवळ तिच्या पतीच्या अवतीभवती फिरू शकत नाही. तिला तिची स्वप्नं पूर्ण करण्याचा संपूर्ण अधिकार आहे. कोमलचं लग्न एका सव्वीसवर्षीय एनआरआयसोबत (NRI) झालं होतं. कोमलच्या पतीनं केवळ त्याला न्यूजीलँडला (New Zealand) जायचं आहे या एका कारणावरून कोमलला सोडलं. कोमल सांगते, 'आपल्याला नेहमी असं वाटतं, की लग्न आपल्याला परिपूर्ण बनवतं. मलाही असंच वाटत होतं. पण पतीनं सोडलं तेव्हा मी विचार केला, की केवळ लग्न हे सर्वकाही नाही तर एका महिलेचं जीवन अजून बरंच अर्थपूर्ण आहे.'

गुजराती मीडियममधून शिकलेली कोमल लग्नाच्या वर्षीच साहित्याच्या विषयात टॉपर म्हणून यशस्वी झाली. लग्नाआधी ती एका शाळेत शिक्षिकाही होती. कोमलनं मुक्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन करत तीन वेगवेगळ्या भाषांची तीन विद्यापीठांमधून पदवी मिळवली आहे. इतकंच काय कोमलनं काही काळापूर्वी गुजरात लोक सेवा आयोगाची मेन्स परीक्षाही क्लियर केली होती. मात्र पतीनं तिला मुलाखतीसाठी जाण्याची परवानगी दिली नव्हती. आता कोमल रक्षा मंत्रालयात एडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर म्हणून कार्यरत आहे.

First published:

Tags: Gujrat, Inspiring story, Success story, Upsc exam