ग्रॅज्युएट्सना महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात नोकरीची संधी, 'असा' करा अर्ज

ग्रॅज्युएट्सना महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात नोकरीची संधी, 'असा' करा अर्ज

Jobs - तुम्ही पदवीधर असाल तर नोकरीची चांगली संधी आहे. जाणून घ्या त्याबद्दल

  • Share this:

मुंबई, 10 ऑगस्ट : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात नोकरीची संधी आहे. नाशिक इथे 95 व्हेकन्सीज आहेत. कक्ष अधिकारी, उच्च श्रेणी लघुलेखक, सहाय्यक लेखापाल, कॅमेरामन, क्लार्क, टायपिस्ट, शिपाई, ड्रायव्हर अशा 95 पदांवर व्हेकन्सीज आहेत.

शैक्षणिक पात्रता

शिपाई आणि ड्रायव्हरसाठी 4थी उत्तीर्ण हवं. बाकी पदांच्या गरजेप्रमाणे त्या त्या पदवी आवश्यक आहेत.

वयाची अट

9 ऑगस्ट 2019 रोजी 18 ते 38 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे. मागासवर्गीयांसाठी 5 वर्षांची सवलत आहे.

लवकरच महागणार ट्रेनचा प्रवास, IRCTC लावणार हा दर

अर्जाची फी

खुल्या वर्गासाठी 700 रुपये आणि मागासवर्गीयांसाठी 500 रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 12 ऑगस्ट 2019.

पावसाचा फटका मालिकांनाही! तरीही कलाकारांनी म्हटलं, शो मस्ट गो ऑन

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी https://mahapariksha.gov.in/OnlinePortal/regMUHS इथे क्लिक करा.

तसंच,जळगावमध्ये जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेत व्हेकन्सी आहे. इथे 220 पदांवर नियुक्त्या केल्या जातील. योग्य आणि इच्छुक उमेदवारांनी JDCC बँकेच्या jdccbank.com या वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा.

या पदांसाठी 20 ऑगस्टपर्यंत अर्ज करू शकता. 20 ऑगस्टपर्यंत संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. या पदासाठी अर्ज केल्यानंतर ऑनलाइन प्रिंटआउट घेण्याची शेवटची तारीख आहे 4 सप्टेंबर. या पदासाठी उमेदवार मान्यताप्राप्त संस्थेकडून 50 टक्के मार्क मिळवून पदवीधर हवा. उमेदवाराचं वय 21 ते 30 वर्षाच्या आत हवं.

माझ्या नवऱ्याची बायको : अखेर राधिका सौमित्रला लग्नासाठी देते होकार पण...

अशी होईल निवड

उमेदवाराची निवड दोन भागांत होणाऱ्या परीक्षेनं होईल. पहिल्यांदा ऑनलाइन लिखित परीक्षा आणि नंतर इंटरव्ह्यू घेऊन निवड होईल.

तसंच, इंटरनॅशनल इन्स्टिट्युट फाॅर पाॅप्युलेशन (IIPS ) म्हणजेच आंतरराष्ट्रीय लोकसंख्या संस्था इथे नोकरीची चांगली संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी या पदासाठी 16 ऑगस्टपर्यंत अर्ज करावा. ही भरती फॅमिली हेल्थ सर्वेसाठी होतेय. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून याला मदत मिळतो.

या पदासाठी एकूण 15 जागा आहेत. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे Demography/Mathematics/ Statistics/Social Sciences यात M.Philची पदवी हवी. शिवाय दोन वर्षांचा कामाचा अनुभव हवा. किंवा IIPS सोबत मास्टर ऑफ पाॅप्युलेशन स्टडीजबरोबर एक वर्ष कामाचा अनुभव हवा.

VIDEO : पूरपरिस्थिती भयंकर, राज ठाकरेंनी केली 'ही' मागणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: jobs
First Published: Aug 10, 2019 10:11 PM IST

ताज्या बातम्या