मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

अजबच! नऊ जुळ्या भावंडांच्या जोड्यांचा एकाच वेळी मेडिकल कॉलजेमध्ये प्रवेश

अजबच! नऊ जुळ्या भावंडांच्या जोड्यांचा एकाच वेळी मेडिकल कॉलजेमध्ये प्रवेश

नऊ जुळ्या भावंडांच्या जोड्यांपैकी (Twin Sibling)बऱ्याच जणांची परिस्थिती अगदी बेताची आहे. कामगारांची ही मुलं आहेत. त्यांनी मेडिकलला (MBBS) प्रवेश घेऊन नवा विक्रम केला आहे.

    अहमदाबाद, 7 डिसेंबर :  काही दिवसांपूर्वी दोन जुळ्या बहिणींनी एकत्र पोलिसांत भरती केली होती. गुजरातमधील (Gujrat) मेडिकल कॉलेजमध्ये (Medical Colleges) मध्ये MBBS च्या अभ्यासासाठी एक नाही दोन नाही तर तब्बल नऊ जुळ्या भावंडांच्या जोड्या (Twin Sibling) प्रवेश घेणार आहेत. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ ने ही बातमी दिली आहे. कष्टाने केली परिस्थितीवर मात विशेष म्हणजे यामधील काही भावंडांनी अगदी साधारण परिस्थितीमधून मेडिकलला प्रवेश मिळवला आहे. कामगारांचे कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करणाऱ्या जयेश खात्रा यांची अगदीच बेताची परिस्थिती आहे. खात्रा यांच्या देवांश आणि देवांशी या जुळ्या मुलांनी NEET परीक्षेत यश मिळवत एमबीबीएसला प्रवेश मिळवला आहे. शैलेश महापात्रा हे हिरा पॉलिश करणारे कामगार आहेत. त्यांच्या जान्हवी आणि जानकी यांनी मेडिकलला प्रवेश मिळवला आहे. घरच्या परिस्थितीमुळे या बहिणींना कोणत्याही कोचिंग क्लासेसमध्ये शिकणे शक्य नव्हते. त्यांनी घरी बसूनच अभ्यास करत हे यश संपादन केले आहे. महापात्रा यांना एकूण चार मुलं असून मुलींच्या मेडिकल प्रवेशासाठी त्यांनी आता कर्ज घेतले आहे. शैलेश महापात्रांप्रमाणेच जयेश बापोदेरियया देखील हिरा पॉलिश करणारे कामगार आहेत. त्यांची पिंकेश आणि प्रिन्स ही जुळी मुलं आता डॉक्टर होणार आहेत. या मुलांच्या शिक्षणासाठी जयेश यांनी घरातील दागिने विकले होते. मुलांनी या परिस्थितीची जाणीव ठेवत NEET परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. वडिलांचं स्वप्न पूर्ण वडिलांचे एमबीबीएस होण्याचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी देखील यामधील एका जुळ्या भावंडांना मिळाली आहे. संजय दाबोरिया हे आयुर्वेदीक डॉक्टर आहेत. त्यांच्या कृष्णा आणि केन्वी या जुळ्या मुलांनी आता एमबीबीएसला प्रवेश घेतला आहे. गुजरातमध्ये जुळ्या भावंडांनी मेडिकल कॉलेजमध्ये घेण्याचे प्रमाण गेल्या दोन वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दोन वर्षांपूर्वी एखादीच जुळी भावंडं मेडिकल कॉलेजमध्ये शिकत होती. मागच्या वर्षी सात जोड्यांनी मेडिकलला प्रवेश घेतला. यावर्षी ही संख्या आणखी दोनने वाढली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Gujrat

    पुढील बातम्या