मराठी बातम्या /बातम्या /करिअर /Breaking: विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा; मुंबईत 'या' वर्गांसाठी 4 ऑक्टोबरपासून सुरु होणार शाळा; आयुक्तांची माहिती

Breaking: विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा; मुंबईत 'या' वर्गांसाठी 4 ऑक्टोबरपासून सुरु होणार शाळा; आयुक्तांची माहिती

मुंबईतील शाळा कधी सुरू होणार आणि कोणत्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरु होणार याबद्दलचो माहिती मुंबईचे आयुक्त इक्बाल चहल यांनी दिली आहे.

मुंबईतील शाळा कधी सुरू होणार आणि कोणत्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरु होणार याबद्दलचो माहिती मुंबईचे आयुक्त इक्बाल चहल यांनी दिली आहे.

मुंबईतील शाळा कधी सुरू होणार आणि कोणत्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरु होणार याबद्दलचो माहिती मुंबईचे आयुक्त इक्बाल चहल यांनी दिली आहे.

मुंबई, 29 सप्टेंबर: कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून शाळा (Schools Reopening Maharashtra)आणि कॉलेजेस बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अडचणी येत आहेत. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागला आहे. त्यामुळे आता राज्यात पुन्हा शाळा (School opening date Maharashtra) सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या 4 ऑक्टोबरपासून राज्यात शाळा सुरु होणार अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मात्र मुंबईतील शाळा (School openings date in mumbai) कधी सुरू होणार आणि कोणत्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरु होणार याबद्दलचो माहिती मुंबईचे आयुक्त इक्बाल चहल यांनी दिली आहे.

येत्या 4 ऑक्टोबरपासून मुंबईतीळ शाळाही सुरु करण्यात येणार आहे. मात्र शाळा फक्त आठवी ते बारावीच्याच्या विद्यार्थ्यांसाठी सुरु करण्यात येणार आहेत. त्याखालील वर्गांच्या शाळा सुरु करण्याबाबतचा निर्णय पुढील महिन्यात म्हणजेच दिवाळीनंतर नोव्हेंबरमध्ये घेण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबईचे आयुक्त इक्बाल चहल यांनी दिली आहे.

मुंबईतील शाळा सुरु करण्याबाबत सोमवार - मंगळवारपर्यंत या संदर्भात निर्णय घेण्यात येईल. ग्रामीण भागात पाचवी पासून वर्ग सुरू होत आहेत. पण शहरी भागात आठवीपासून शाळा सुरू होत आहेत. मुंबई मनपाच्या शाळा आठवी ते बारावी पर्यंतच्या सुरू करणार आहोत. अशी माहिती काही दिवसांपूर्वी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडून देण्यात आली होती. त्यानुसार आता हा निर्णय घेण्यात आला आहे.

हे वाचा - CBSE Result 2021: CBSE च्या विशेष परीक्षेचा निकाल 'या' तारखेला होणार जाहीर

शाळा सुरु झाल्यानंतरही राज्य शासनाकडून कोरोनच्या संदर्भात जारी करण्यात आलेलं नियम काटेकोरपणे पाळण्यात येणार आहेत. जेणेकरून विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचा धोका होणार नाही असंही आयुक्त इक्बाल चहल यांनी म्हंटलं आहे. यासाठी काही नियम आखून देण्यात आले आहेत.

काय आहेत सूचना

शाळा सुरु करण्यापूर्वी आणि शाळा सुरु झाल्यानंतर आरोग्य, स्वच्छता व इतर सुरक्षा विषयक उपाययोजना राबनवण्यात याव्यात.

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील मनपा शाळांचे सहाय्यक आयुक्त यांच्या सहाय्याने सोडीयम हायपोक्‍्लोराईड सोल्युशनने निर्जतुंकीकरण करुन घेण्यात यावे तसेच, इतर व्यवस्थापनांच्या शाळांनी आपल्या स्तरावर वर्गांचे निर्जतुंकीकरण करुन घ्यावे.

राज्य शासनाकडून जारी करण्यात आलेल्या कोरोनासंबंधी नियमांचं काटेकोरपणे पालन करण्यात यावं.

शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी विशेष लसीकरण ड्राईव्ह

आता संभाव्य तिसऱ्या लाटेची भीती कमी झाली आहे. गावावरून आलेले लोक कोरोना टेस्ट करण्यासाठी कमी येत आहेत. मुंबईतील पॉझिटिव्हिटी रेट 0.06 टक्के इतका आहे. मुंबईतील 15 टक्के बेड्स रुग्णांनी भरलेले आहेत. मुंबईतील जवळपास 70 टक्के शिक्षकांचं लसीकरण पूर्ण झालेलं आहे. शिक्षकांच्या लसीकरणावर भर देत आहोत. शिक्षकच नाही तर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी विशेष ड्राईव्ह घेतला जाईल जेणेकरुन सर्व शिक्षक लसवंत होतील असंही महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

First published:
top videos

    Tags: Mumbai