राज्यात सरकारी नोकरीची संधी! 46 वर्षांपर्यंतच्या व्यक्ती करू शकतात अर्ज

Maharashtra State, Rural Livelihoods mission- राज्याच्या प्रकल्पात नोकरी करण्याची मोठी संधी आहे

News18 Lokmat | Updated On: Jul 27, 2019 08:30 AM IST

राज्यात सरकारी नोकरीची संधी! 46 वर्षांपर्यंतच्या व्यक्ती करू शकतात अर्ज

मुंबई, 27 जुलै : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती प्रकल्पाअंतर्गत अकोला इथे अनेक पदांवर भरती सुरू होत आहे. अकाउंटंट, क्लार्क, प्रशासन सहाय्यक, डाटा एंट्री ऑपरेटर, शिपाई, प्रभाग समन्वयक, प्रशासन/लेखा सहाय्यक या पदांवर ही व्हेकन्सी आहे. एकूण जागा 73 आहेत.

अकाउंटंट, क्लार्क, प्रशासन सहाय्यक, डाटा एंट्री ऑपरेटर, शिपाई, प्रभाग समन्वयक, प्रशासन/लेखा सहाय्यक या पदांसाठी जिल्हा अभियान कक्ष आणि तालुका अभियान कक्ष इथे काम करावं लागेल.

3 ते 5 वर्षाचा नोकरीचा अनुभव आहे? मग पुढच्या 6 महिन्यांत अशी मिळेल मोठी संधी

अकाउंटंट, क्लार्क, प्रशासन सहाय्यक, डाटा एंट्री ऑपरेटर यांना टायपिंग येणं आवश्यक आहे.

वयाची अट - 26 जुलै 2019 रोजी 18 ते 38 वर्षापर्यंत हवं. मागासवर्गीयांना 5 वर्ष सूट आहे.

Loading...

अर्जाची फी - खुला वर्ग - 374 रुपये आणि मागासवर्गीयांसाठी 274 रुपये आहे.

2 लाख रुपयात सुरू करा 'हा' व्यवसाय आणि महिन्याला कमवा 50 हजार

नोकरीचं ठिकाण अकोला आहे.

ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख - 8 ऑगस्ट 2019

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी http://akolamsrlm.padbharti.com इथे क्लिक करा.

सायन्स ग्रॅज्युएट्सना राज्याच्या प्रकल्पात मोठी व्हेकन्सी,असं असेल कामाचं स्वरूप

तसंच,महाराष्ट्र शासनाच्या पथदर्शी प्रकल्पात 702 जागांवर भरती आहे. इथे किसान मित्र या पदासाठी व्हेकन्सी आहे. सायन्स ग्रॅज्युएट्सना इथे काम करायची संधी मिळणार आहे.

पद - किसान मित्र

पदाची संख्या - 702

शैक्षणिक पात्रता - B.Sc (कृषी) किंवा B.Sc (उद्यानविद्या)

वयाची अट - 1 जुलै 2019 रोजी 21 ते 46 वर्षापर्यंत हवं. 46 वर्षानंतरच्या व्यक्तींनी अर्ज करू नका.

कामाचं स्वरूप - नेमून दिलेल्या गावांमध्ये  शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी अत्याधुनिक तंत्राची माहिती देणं, तंत्रज्ञान प्रचार आणि प्रसारासाठी मल्टिमीडियाचा वापर करणं, गावातली कृषीविषयक पायाभूत साधन सुविधांची माहिती संकलीत करणं, प्रयोगशील आणि प्रगतीशील शेतकऱ्यांची गाथा संकलित करणं, ग्रामसभा घेणं अशी बरीच कामं असतात.

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 30 जुलै 2019

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी https://sarthi-maharashtragov.in/ इथे क्लिक करा

अजित पवारांच्या संतापावर सचिन अहिर बोलले, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: jobs
First Published: Jul 27, 2019 08:30 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...