Home /News /career /

धक्कादायक रिपोर्ट! 2022मध्ये IT क्षेत्रात येणार मोठा भूकंप? तब्बल 30 लाख जणांची जाणार नोकरी

धक्कादायक रिपोर्ट! 2022मध्ये IT क्षेत्रात येणार मोठा भूकंप? तब्बल 30 लाख जणांची जाणार नोकरी

2022 मध्ये IT क्षेत्रात (Information technology) मोठा भूकंप येण्याची शक्यता आहे असं या रिपोर्टमध्ये म्हंटलंय.

    नवी दिल्ली, 17 जून : कोरोना महामारीमुळे (Corona virus) आधीच संपूर्ण जग संकटात आहे. गेल्या दीड वर्षांपासुन अनेक महत्त्वाचे व्यवहार ठप्प आहेत. त्यामुळे अनेकांचे रोजगार गेले (Unemployment) आहेत तर काही जणांना आपली नोकरीही गमवावी लागली आहे. मात्र आता बँक ऑफ अमेरिकेच्या (Bank of  America) एका रेपोर्टनं संपूर्ण जगात खळबळ माजवली आहे. या रिपोर्टमधून धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. 2022 मध्ये IT क्षेत्रात (Information technology) मोठा भूकंप येण्याची शक्यता आहे असं या रिपोर्टमध्ये म्हंटलंय. तसंच आयटी क्षेत्रात तब्बल 30 लाख जणांची नोकरी जाण्याची भीतीही या रिपोर्टमधून वर्तवण्यात आली आहे. बँक ऑफ अमेरिकेनं (Bank of America IT report)  जाहीर केलेल्या या रिपोर्टनुसार आयटी कंपन्यांनी कोरोना कालावधीत ऑटोमेशनची (Automation) गती वाढवण्यास सुरुवात केली आहे. टेक्नॉलॉजीकल (technological Automation) कंपन्यांमध्ये ऑटोमेशनचा उपयोग अधिक प्रमाणात करण्यात येत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांवरील अवलंबता कमी झाली आहे. त्यात या सर्व कर्मचाऱ्यांच्या पगारामुळे कंपनीला अधिक आर्थिक नुकसान होत आहे.\ हे वाचा - Explainer: 5G खरंच मानवी शरीराला हानीकारक ठरणार का? काय आहेत तथ्यं? जाणून घ्या या रिपोर्टनुसार, सध्या आयटी क्षेत्रात काम करणाऱ्यांची संख्या जवळपास दीड कोटींपेक्षा जास्त आहे. मात्र यातील बहुतांश लोकं हे लो-स्किल्ड (Low Skilled) आहेत म्हणजेच हे लोकं बीपीओमध्ये (BPO) काम करणारे आहेत. अशा कर्मचाऱ्यांना ऑटोमेशन वापरून घरी पाठवणं सहज शक्य आहे. यामुळे कंपन्यांचा पैसाही वाचणार आहे. असं झाल्यास कंपन्यांचे तब्बल 100 अब्झ डॉलर इतके पैसे वाचणार आहेत. आयटी क्षेत्रात तब्बल 90 लाखांपेक्षा जास्त कर्मचारी हे लो-स्किल्ड किंवा बीपीओमध्ये काम करणारे आहेत. आता TCS, Infosys, Wipro, HCL, Tech Mahindra ,Cognizant आणि इतर कंपन्या 30 लाख मॅनपॉवर कमी करण्याच्या तयारीत आहे. मात्र याचा संपूर्ण फायदा हा कंपन्यांना होणार आहे. या कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या पैशातून कंपनीला नवीन टेक्नॉलॉजीवर काम करण्यास आर्थिक बळ मिळणार आहे. त्यामुळे जर आयटी क्षेत्राला इतका मोठा फटका बसला तर कर्मचाऱ्यांचं मात्र नुकसान होणार आहे. अनेकांची नोकरी जाऊन बेरोजगारी परत वाढणार आहे हे नक्की. मात्र यातून मार्ग काढायचा असेल तर कर्मचाऱ्यांना स्किल डेव्हलपमेंटवर (Skill development) लक्ष देण्याची अधिक गरज आहे.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Delhi, Jobs

    पुढील बातम्या