मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

अभिमानास्पद! NDA च्या माध्यमातून प्रथमच 20 महिला कॅडेट्सची सैन्यात होणार भरती; 10 अधिकाऱ्यांना संधी

अभिमानास्पद! NDA च्या माध्यमातून प्रथमच 20 महिला कॅडेट्सची सैन्यात होणार भरती; 10 अधिकाऱ्यांना संधी

येणाऱ्या वर्षीच्या NDA परीक्षांसाठी रजिस्ग्ट्रेशन सुरु झालं आहे.

येणाऱ्या वर्षीच्या NDA परीक्षांसाठी रजिस्ग्ट्रेशन सुरु झालं आहे.

'NDA`च्या मार्फत सुमारे 20 महिला कॅडेट्सची (Women Cadets) सैन्यात भरती केली जाईल आणि तिन्ही सेना दलांमध्ये वेगवेगळ्या पदांवर त्या सेवा देतील.

नवी दिल्ली, 10 नोव्हेंबर:  सैन्यदलात भरती होऊन देशसेवा करण्याचं अनेक युवकांचं स्वप्न असतं. ते पूर्ण करण्यासाठी अनेक जण कठोर परिश्रम घेत असतात. यासाठी विशिष्ट अभ्यासक्रम पूर्ण करणं आवश्यक असतं. हा अभ्यासक्रम पुण्यात नॅशनल डिफेन्स अॅकॅडमीतून (National Defence Academy) पूर्ण करता येतो. त्यासाठी प्रवेश परीक्षा (Entrance Exam) घेतली जाते. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच संबंधित युवकाला `एनडीए`मध्ये प्रवेश मिळतो. यापूर्वी केवळ पुरुष उमेदवारांनाच या अॅकॅडमीत प्रवेश दिला जात होता. महिला उमेदवारांनाही या अॅकॅडमीत प्रशिक्षणाची संधी मिळावी, अशी मागणी केली जात होती.

या पार्श्वभूमीवर नॅशनल डिफेन्स अॅकॅडमी अर्थात `एनडीए`च्या प्रवेश परीक्षेत महिला (NDA admission for women) उमेदवारांचा समावेश करण्यास सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court) अलीकडेच परवानगी दिली. त्यामुळे येत्या 14 नोव्हेंबरला होणाऱ्या एनडीएच्या प्रवेश परीक्षेला महिला उमेदवार बसू शकतात. `News18.comने दिलेल्या माहितीनुसार, पुढील वर्षी 'NDA`च्या मार्फत सुमारे 20 महिला कॅडेट्सची (Women Cadets) सैन्यात भरती केली जाईल आणि तिन्ही सेना दलांमध्ये वेगवेगळ्या पदांवर त्या सेवा देतील.

कॅडेट्स 12 वी बोर्ड परीक्षेनंतर त्यांच्या प्री-कमिशन प्रशिक्षणासाठी `एनडीए`त प्रवेश घेतात. 20 महिला कॅडेट्सपैकी सैन्य दलात 10 महिला अधिकाऱ्यांची सर्वांत मोठी तुकडी असेल. त्यानंतर भारतीय हवाई दल (Indian Air Force) आणि नौदलात (Indian Navy) प्रत्येकी पाच महिला अधिकारी असतील.

BREAKING: MPSC परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना एका वर्षाची मुदतवाढ

`महिला उमेदवारांना `एनडीए`च्या प्रवेश परीक्षेला बसण्याची परवानगी पुढील वर्षापासून द्यावी,` अशी विनंती केंद्र सरकारनं (Central Government) केली होती; मात्र सप्टेंबरमध्ये सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारची ही विनंती फेटाळली होती. केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं होतं की महिला उमेदवारांना एनडीए प्रवेश परीक्षेला बसण्याची परवानगी देणारी अधिसूचना पुढील वर्षी मे महिन्यापर्यंत जारी केली जाईल. परंतु त्यावर, 'महिलांना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवता येणार नाही. `एनडीए`त प्रवेश घेण्यासाठी महिला एक वर्ष वाट पाहू शकत नाहीत,' असं न्यायालयानं म्हटलं होतं.

त्यामुळे सर्वोच्च न्यायालयानं या वर्षीपासूनच `एनडीए`च्या प्रवेश परीक्षेत मुलींचा समावेश करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार केंद्र सरकारने पुण्यात नॅशनल डिफेन्स अॅकॅडमी अर्थात एनडीएमध्ये मुलींना प्रवेश देण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं. न्यायालयाच्या या आदेशानुसार आता महिला उमेदवारांना 14 नोव्हेंबरला होणाऱ्या एनडीए प्रवेश परीक्षेला बसता येणार आहे.

सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दर वर्षी सहा लाखांहून अधिक उमेदवार दर वर्षी चार एनडीए प्रवेश परीक्षा आणि दोन संयुक्त संरक्षण सेवा परीक्षांसाठी अर्ज करतात. या परीक्षांचं आयोजन लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससीमार्फत (UPSC) केलं जातं.

First published:

Tags: Career, NDA