मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

मुंबईच्या युवराजनं उंचावली देशाची मान! जगातील उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून झाली निवड; वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान

मुंबईच्या युवराजनं उंचावली देशाची मान! जगातील उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून झाली निवड; वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान

ही फक्त महाराष्ट्रासाठीच नाही तर संपूर्ण देशासाठी गर्वाची गोष्ट आहे.

ही फक्त महाराष्ट्रासाठीच नाही तर संपूर्ण देशासाठी गर्वाची गोष्ट आहे.

ही फक्त महाराष्ट्रासाठीच नाही तर संपूर्ण देशासाठी गर्वाची गोष्ट आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 28 ऑगस्ट: मुंबईतील 14 वर्षीय विद्यार्थ्यानं संपूर्ण देशाची मान उंचावली आहे. जगातील सर्वोत्तम विद्यार्थ्यांपैकी (World's Best Student) एक म्हणून त्याचा गौरव करण्यात आला आहे. रुपारेल युवराज (Ruparel Yuvraj) असं या विद्यार्थ्यांचं नाव आहे. आदित्य बिर्ला वर्ल्ड अ‍ॅकॅडमी डे स्कूलमध्ये (Aditya Birla World Academy Day School) शिकणाऱ्या रुपारेल युवराजला द जॉन्स हॉपकिन्स सेंटर फॉर टॅलेंटेड युथ (The Johns Hopkins Center for Talented Youth ) (CTY) ने SAT आणि ACT या टेस्टमधील अपवादात्मक कामगिरीबद्दल सन्मानित केलं आहे. त्यामुळे ही फक्त महाराष्ट्रासाठीच नाही तर संपूर्ण देशासाठी गर्वाची गोष्ट आहे.

या स्पर्धेत, 84 देशांतील 19,000 हून अधिक उज्ज्वल विद्यार्थी सहभागी झाले होते आणि 20 टक्क्यांपेक्षा कमी सहभागी CTY उच्च सन्मान पुरस्कारांसाठी पात्र ठरतात. रुपारेल युवराज याचा असा दावा आहे की गणितावरचं त्याचं प्रेम यामुळेच आंतरराष्ट्रीय परीक्षांमध्ये उत्तीर्ण होण्यास मदत झाली.

जगातील सर्वात हुशार विद्यार्थ्यांपैकी युवराज म्हणतो की, भारतीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील परीक्षांमध्ये (International Exams) खूप फरक आहे तर आंतरराष्ट्रीय परीक्षा अप्लिकेशन बेस्ड आहेत आणि तुमचं ज्ञान आणि लॉजिकची परीक्षा घेतात. तर भारतीय परीक्षा कन्सेप्ट बेस्ड आहेत ज्या तुमच्या ज्ञानावर आधारित असतात.

हे वाचा - आश्चर्यच! पुण्यात स्कॉलर मुलांचा ओढा सायन्सऐवजी चक्क आर्ट्सकडे; यामागचं नक्की कारण काय? वाचा

रुपारेल युवराज हा CTY च्या ऑनलाइन आणि समर प्रोग्राम्ससाठी देखील पात्र ठरला आहे. ज्याद्वारे तेजस्वी विद्यार्थी जगभरातील इतर उज्ज्वल विद्यार्थ्यांसह कम्युनिटी तयार करू शकणार आहे.

एरोस्पेस इंजिनिअर होण्याचं स्वप्न

रुपारेलला एरोस्पेस इंजिनिअर (Aerospace Engineers) व्हायचं आहे आणि नवीन तंत्रज्ञान विकसित करायचं आहे. “दररोज असंख्य प्रकल्प आणि संधी येत असताना, मला जगाला अधिक चांगलं स्थान देण्यासाठी नवीन आणि रोमांचक तंत्रज्ञान आणि कार्यक्रमांवर काम करायचं आहे,” असं त्यानं सांगितलं आहे.

First published:

Tags: Mumbai, Student, Success story