मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

टाटा मेमोरियल सेंटरमध्ये 60 हजार रुपये महिन्याची नोकरी, 10वी पास उमेदवारांनाही संधी

टाटा मेमोरियल सेंटरमध्ये 60 हजार रुपये महिन्याची नोकरी, 10वी पास उमेदवारांनाही संधी

टाटा मेमोरियल सेंटरमध्ये 60 हजार महिन्याची नोकरी

टाटा मेमोरियल सेंटरमध्ये 60 हजार महिन्याची नोकरी

टाटा मेमोरियल सेंटरने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर 164 एमटीएस, डीईओ पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. TMC भर्ती 2022 अर्ज प्रक्रिया, वयोमर्यादा, पात्रता आणि इतर तपशील येथे पहा.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 21 नोव्हेंबर : सरकारी नोकरीमध्ये आता अनेक रिक्त पदं उपलब्ध आहेत. त्यामुळे उमेदवार सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करू शकतात. टाटा मेमोरियल सेंटरमध्ये नुकत्याच नोकरीच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत. यात मल्टिटास्किंग स्टाफसाठीही काही जागा असून, विशेष म्हणजे केवळ 10 वी पास उमेदवारही यासाठी अर्ज करू शकतात.

टाटा मेमोरियल सेंटरनं 164 विविध पदांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. मल्टिटास्किंग स्टाफ, डेटा एन्ट्री ऑपरेटर, नर्स, संशोधन साहाय्यक, तांत्रिक अधिकारी यांसह इतर पदांसाठी पदभरती करणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यासाठी पात्र उमेदवार 22 नोव्हेंबर ते 14 डिसेंबरपर्यंत मुलाखतीसाठी येऊ शकतात.

मल्टिटास्किंग स्टाफ (एमटीएस) – 12

टेक्निकल अधिकारी – 2

टेक्निकल को-ऑर्डिनेटर (डेटा) - 1

टेक्निकल को-ऑर्डिनेटर (मेडिकल) - 1

डेटा एंट्री ऑपरेटर - 38

फिल्ड इन्व्हेस्टिगेटर - 2

रिसर्च असिस्टंट - 1

डेटा एंट्री ऑपरेटर - 1

नर्स - 24

पेशंट असिस्टंट - 38

फार्मासिस्ट - 6

मल्टिटास्किंग स्टाफ (एमटीएस) – 38

वाचा - नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक, ईडीने गोठवली 80 बँक खाती

या विविध पदांसाठी उमेदवारांची पात्रता दहावी, बारावी, बीफार्म, पदवीधारक, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस, एमडीएस, आयुष, एमपीएच, एमडीएस अशी असावी लागेल. प्रत्येक पदानुसार अपेक्षित पात्रता असलेले उमेदवार त्याकरता अर्ज करू शकतात. टाटा मेमोरियल सेंटरच्या वेबसाईटवर उमेदवारांना पदभरतीबाबत अधिक माहिती मिळू शकते. यात अर्ज प्रक्रिया, पगार, वयोमर्यादा, पात्रता, अनुभव, निवड प्रक्रिया व इतर आवश्यक माहिती असेल. मल्टिटास्किंग स्टाफची अनेक पदं यात भरली जाणार आहेत. त्यासाठी दहावी पास असणं गरजेचं आहे. तसंच संबंधित क्षेत्रासाठी आवश्यक अनुभवही असावा लागेल.

पदभरतीसाठी आवश्यक कागदपत्रं पूर्ण करून 22 नोव्हेंबर ते 14 डिसेंबरपर्यंत दिलेल्या तारखांनुसार मुलाखतीसाठी उमेदवार येऊ शकतात. विविध पदांसाठीच्या सूचना टीएमसीच्या वेबसाईटवर पाहता येतील. त्यामध्ये प्रत्येक पदासाठी पगाराची मर्यादाही नमूद केलेली आहे. सर्वसाधारणपणे 12 हजार रुपये महिना ते 60 हजार रुपये महिना असा या पदांसाठीचा पगार असेल. त्यासाठी https://tmc.gov.in/m_events/Events/JobDetail?jobld=18372 या वेबसाईटवर अधिक माहिती मिळेल.

शिक्षणाच्या अभावामुळे सरकारी नोकरीपासून वंचित असलेल्या अनेक उमेदवारांना आता टीएमसीमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. इच्छुक व पात्र उमेदवार त्याचा लाभ घेऊ शकतात. त्यासाठी पदाची माहिती, कागदपत्रं गोळा करून वेळेत अर्ज भरणं जरुरीचं आहे.

First published:

Tags: Job alert, Tata group