200 रुपयांची नोटही उद्यापासून चलनात येणार

200 रुपयांची नोटही उद्यापासून चलनात येणार

आरबीआयकडून आता 200 रुपयांची नोटही बाजारात येणार आहे. गणेश चतुर्थीच्या मुहुर्तावर म्हणजेच उद्यापासूनच ही 200 रुपयांची नोट बाजारात आणली जातेय.

  • Share this:

नवी दिल्ली, 24 ऑगस्ट : आरबीआयकडून आता 200 रुपयांची नोटही चलनात येणार आहे. गणेश चतुर्थीच्या मुहुर्तावर म्हणजेच उद्यापासूनच ही 200 रुपयांची नोट बाजारात आणली जातेय. सुट्ट्या पैशांचा तुटवडा कमी करण्यासाठी 200 रुपयांच्या नोटेचा फायदा होईल, असा आरबीआयला विश्वास आहे. बाजारात सध्या 100 नंतर थेट 500ची नोट उपलब्ध आहे. 200रुपयाच्या नोटेमुळं हा मधला स्लॅब बऱ्यापैकी भरून निघेल असं आरबीआयला वाटतंय.

प्रारंभी 50 कोटी किंमतीच्या 200 रुपयांच्या नोटा चलनात आणल्या जाणार आहेत. काळ्या पैशांना आळा घालण्यासाठी या नव्या करन्सीचा मोठा फायदा होईल असा दावा सरकारकडून केला जातोय. गेल्याच आठवड्यात 50 रुपयांची नवी नोटही बाजारात आणली गेलीय. दोनशेच्या नोटेचा रंग पिवळसर असून नोटेच्या पाठीमागे सांची स्तूपाचं छायाचित्रं छापण्यात आलंय.

First published: August 24, 2017, 2:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading