• Home
  • »
  • News
  • »
  • business
  • »
  • 50 रुपयांची नवी नोट चलनात येणार

50 रुपयांची नवी नोट चलनात येणार

आरबीआयकडून 50 रुपयांची नवी नोट चलनात आणण्यात आलीय. आरबीआयनेच आज यासंबंधीचं प्रसिद्धी पत्रक दिलंय. थोड्याच दिवसात ही 50 रुपयांची नवी नोट बाजारात बघायला मिळणार आहे.

  • Share this:
नवी दिल्ली, 18 ऑगस्ट : देशातल्या लोकांना दोनशे आणि हजार रुपयांच्या नव्या नोटेची प्रतीक्षा असतानाच आता पन्नास रुपयांची नोट चलनात येणार आहे. आरबीआयनं पन्नास रुपयांच्या नोटेचा फोटो जाहीर करण्यात आलाय. आरबीआयनेच आज यासंबंधीचं प्रसिद्धी पत्रक दिलंय. थोड्याच दिवसात ही 50 रुपयांची नवी नोट बाजारात बघायला मिळणार आहे. नोटबंदीनंतर आरबीआयने 500 आणि 2 हजारांची नवी नोट बाजारात आणली होती. त्यानंतर आता 50 रुपयांची नोटही चलनात आणलीय. अर्थात 50 रुपयांची नवी नोट आली असली तरी जुनी नोट लगेच रद्द होणार नाही. पन्नास रुपयांच्या नोटेचा रंग हिरवा असून त्यावर देवनागरीत पन्नासचा आकडा लिहण्यात आलाय. या नोटेचं मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे या नोटेवर कर्नाटकातल्या हंपीमधील विठ्ठल मंदिरातील शिल्पाचं चित्र आहे. विजयनगरचे सम्राट राजा कृष्णदेवराय यांनी ओडीशाचा राजा गजपतीला हरवल्यानंतर कोणार्क मंदिराच्या प्रेरणेतून हे शिल्प बनवलं होतं. याच शिल्पाला पन्नास रुपयांच्या नोटेवर ठळक असं स्थान देण्यात आलंय. नोटबंदीनंतर आरबीआयकडून टप्प्या टप्प्याने नव्या नोटा बाजारात आणल्या जाताहेत. त्याचाच भाग म्हणून ही 50 रुपयांची नवी नोट बाजारात आलीय. यानंतर 20 रुपयांची नोटही लवकरच बाजारात आणली जाण्याची शक्यता आहे.
First published: