अत्यंत महत्त्वाची आहे Aadhaarची 'ही' पावती, हरवल्यास तुमचं वाढणार टेन्शन

ज्यांचं आधार कार्ड हरवलं आहे, अशा नागरिकांना पुन्हा आधार कार्ड कसं बनवून घ्यावं? पुन्हा सर्व प्रक्रिया पूर्ण कराव्या लागणार का? यांचंच टेन्शन असावं.

News18 Lokmat | Updated On: Sep 12, 2019 01:48 PM IST

अत्यंत महत्त्वाची आहे Aadhaarची 'ही' पावती, हरवल्यास तुमचं वाढणार टेन्शन

नवी दिल्ली, 12 सप्टेंबर : प्रत्येक भारतीय नागरिकासाठी आधार कार्ड अत्यंत महत्त्वपूर्ण कागदपत्र आहे. ज्यांचं आधार कार्ड हरवलं आहे, अशा नागरिकांना पुन्हा आधार कार्ड कसं बनवून घ्यावं? पुन्हा सर्व प्रक्रिया पूर्ण कराव्या लागणार का? यांचंच टेन्शन असावं. पण अजिबात चिंता करू नका. तुमचं आधार कार्ड जरी हरवल असेल तरीही नोंदणी क्रमांकाच्या आधारे UIDAIच्या संकेतस्थळाला भेट देऊन आधार कार्डचं प्रिंट घेऊ शकता.  एखाद्या व्यक्तीला आपल्या आधार कार्डवरील क्रमांक माहिती नसल्यास यावेळेस ईआयडी तुमचं टेन्शन कमी करतं. ईआयडीच्याच मदतीनं तुम्ही आपलं नवीन आधार कार्ड मिळवू शकता.  कार्डच्या नावनोंदणी पावतीवरील 14-14 आकड्यांच्या बेरजेतून तुम्हाला ईआयडी उपलब्ध होता.

नावनोंदणी पावती का आहे महत्त्वाची?

समजा भविष्यात कधीही तुमचं आधार कार्ड हरवलं आणि यातही तुम्हाला त्यावरील क्रमांकच लक्षात नाही. तर UIDAIच्या संकेतस्थळावरून आधार कार्ड पुन्हा मिळवण्यासाठी नावनोंदणी पावतीवर क्रमांक तुमची मदत करेल. आधार कार्ड मिळाल्यानंतर नावनोंदणी पावती काहीही कामाची नसते, असा बऱ्याच जणांचा गैरसमज आहे. पण ही पावती जपून ठेवल्यास याचा फायदा तुम्हालाच होणार आहे.

(वाचा : तुम्हाला आधार कार्ड अपडेट करायचंय का? आता मोजावी लागेल एवढी फी)

आधार कार्ड नावनोंदणी पावती हरवल्यास ?

Loading...

जर तुमची आधार कार्ड नोंदणी पावतीदेखील हरवल्यास खालील गोष्टी करा

1. uidai.gov.in या संकेतस्थळावर भेट द्या. येथे आधार नोंदणी विभागात जाऊन 'Retrieve Lost UID/EID' या पर्यायावर क्लिक करा.

2. ओपन होणाऱ्या नवीन पेजवर आधार क्रमांक (UID) किंवा नोंदणी क्रमांक यापैकी कोणत्याही पर्यायावर क्लिक करा

3. येथे आपलं नाव, आधारसोबत लिंक केलेला मोबाइल क्रमांक किंवा रजिस्टर्ड ई-मेल आयडी आणि सिक्युरिट कोड येथे पोस्ट करावा.

4. सिक्युरिटी कोड येथे नोंद केल्यानंतर तुमच्यावर मोबाइल किंवा ई-मेलवर एक OTP मिळेल

5. तिथल्या स्पेसमध्ये OTP क्रमांक द्यावा

6. OTP क्रमांक येथे दिल्यानंतर पडताळणी केली जाईल.

7. पडताळणीनंतर नावनोंदणी क्रमांक तुमच्या मोबाइल किंवा ई-मेल पाठवला जाईल

(वाचा : तुमच्या आधार नंबरचा गैरवापर होऊ शकतो, असं करा आधार कार्ड करता लॉक)

कॉल करूनही मिळवू शकता Aadhaar Enrollment Slip

या व्यतिरिक्त 1947 या क्रमाकावरही संपर्क साधून तुम्ही नोंदणी क्रमांक मिळवू शकता.

(वाचा : ATM कार्ड विसरलात? चिंता नको, तरीही तुम्ही 'असे' काढू शकता पैसे)

VIDEO: आभाळ भरलं होतं तू येताना, डोळे भरून आले तू जाताना!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 12, 2019 01:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...