तुम्हाला आधार कार्ड अपडेट करायचंय का? आता मोजावी लागेल एवढी फी

तुम्हाला आधार कार्ड अपडेट करायचंय का? आता मोजावी लागेल एवढी फी

आधार कार्डवरील तुमची माहिती अपडेट करायची असेल तर UIDAI तुमच्यासाठी ऑनलाइन अपॉइंटमेंट (Online appointment) बुकिंगची व्यवस्था सुरू केली आहे.

  • Share this:

आधार कार्ड आता प्रत्येक बाबतींमध्ये महत्त्वाचं आणि आवश्यक झालं आहे. आधार कार्डचा देशातील सर्वाधिक महत्त्वपूर्ण ओळखपत्रांच्या यादीत समावेश केला गेला आहे. सध्या दरदिवशी आधारकार्डसंदर्भात नवनवीन माहिती समोर येत आहे. कार्डवरील तुमची माहिती अपडेट करायची असेल तर UIDAI तुमच्यासाठी ऑनलाइन अपॉइंटमेंट (Online appointment) बुकिंगची व्यवस्था सुरू केली आहे. यासाठी देशातील कित्येक शहरांमध्ये सेंटरदेखील उभारण्यात आले आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का ? आधार कार्डवरील आपला पत्ता, मोबाइल क्रमांक किंवा अन्य काही माहिती अपडेट करण्यासाठी आता शुल्क भरावं लागणार आहे. 1 जानेवारी 2019 पासून आधार कार्ड अपडेट करण्यासाठी शुल्क वाढवण्यात आलं आहे. पण यातील काही सेवांसाठी तुम्हाला कोणत्या कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार नाही.

आता एवढे शुल्क भरावं लागणार -

नाव बदलणं - जर तुम्हाला आधार कार्डवरील आपलं नाव, पत्ता, मोबाइल क्रमांक, ई-मेल आणि बायोमॅट्रिक बदलायचे असल्यास यासाठी 50 रुपये मोजावे लागणार आहेत.

(वाचा : 'असे' करा EPFचे पैसे NPS मध्ये ट्रान्सफर, होईल मोठा फायदा)

कलर प्रिंट आउट - eKYCच्या माध्यमातून आधार सर्च/फाइंड आधार/ किंवा अन्य बाबी आणि A4 साइज कलर प्रिंट आउट हवं असेल तर यासाठी 30 रुपये द्यावे लागतील.

Loading...

बायोमॅट्रिक अपडेट- तुम्हाला आपल्या मुलाचं आधार कार्डवरील त्याचं बायोमॅट्रिक अपडेट करायचं असल्यास यासाठी कोणत्याही प्रकारचं शुल्क भरावं लागणार नाही. ही सुविधा अगदी मोफत आहे.

(वाचा : बँकेचं कर्ज फेडू न शकणाऱ्यांकडेही असतात 'हे' 5 कायदेशीर अधिकार)

आधार नोंदणी - आधार नोंदणीसाठीही तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नाही. म्हणजे तुम्ही अगदी पहिल्यांदाच आधार कार्डसाठी नोंदणी करत असाल तर यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क तुमच्याकडून आकारले जात नाही. नोंदणी पूर्णतः मोफत आहे.

(वाचा : गोल्ड बाॅण्डची विक्री येत्या सोमवारपासून होणार सुरू, 'ही' आहे प्रति ग्रॅम किंमत)

येथे नोंदवा तक्रार - वरील बाबींऐवजी अन्य कोणत्याही गोष्टींसाठी तुमच्याकडून कोणीही पैशांची मागणी करत असेल तर याविरोधात अवश्य तक्रार नोंदवा. 1947 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून आपली तक्रार नोंदवावी. शिवाय, help@uidai.gov.in या ई-मेल आयडीवरही तुम्ही आपली तक्रार पाठवू शकता.

SPECIAL REPROT: 'आरे फॉरेस्ट बचाओ'; वृक्षतोडीविरोधात नागरिकांचा एल्गार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 9, 2019 07:10 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...