मुंबईकरांना अंशत: दिलासा, सेकंड क्लाससाठी 80 कि.मी.पर्यंत भाडेवाढ नाही

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jul 7, 2014 05:31 PM IST

मुंबईकरांना अंशत: दिलासा, सेकंड क्लाससाठी 80 कि.मी.पर्यंत भाडेवाढ नाही

 333mumbai_local_24 जून : रेल्वे दरवाढीमुळे हवालदिल झालेल्या मुंबईकरांना अंशत: दिलासा मिळालाय.लोकलनं प्रवास करणार्‍या मुंबईकरांना रेल्वे बोर्डानं अंशत: दिलासा दिलाय. सेकंड क्लासच्या तिकिटांची दरवाढ पूर्णपणे मागे घेण्यात आलीय. पण, पास मात्र 14 पूर्णांक 2 टक्क्यांनी वाढणार आहे. मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार, पास 100 टक्के ते 189 टक्क्यांनी महागला होता.

पण, ही वाढ कमी करत ती 14 पूर्णांक 2 टक्क्यांवर आणण्यात आलीय. म्हणजे 100 रुपयांच्या पाससाठी आता 114 रुपये मोजावे लागतील. लोकलच्या फर्स्ट क्लासची भाडेवाढ मात्र कमी करण्यात आलेली नाही. फर्स्ट क्लास्ट तिकीट आणि पास दोन्ही महागणार आहेत. एकूणच सामान्यांना दिलासा देण्याच्या नावाखाली थोडी चलाखी केलेली दिसतेय. तिकीटाची दरवाढ पूर्णपणे मागे घेण्यात आली असली तरी महिन्याचा पास मात्र 14 टक्क्यांची वाढ होणार आहे.

ठळक मुद्दे

- 80 किमीपर्यंतच्या सेकंड क्लास तिकिटामध्ये बदल नाही

- सेकंड क्लासच्या पासमध्ये 14.2 टक्के थेट वाढ होणार

Loading...

- फर्स्ट क्लासबद्दल संभ्रम कायम

- 28 तारखेपासून लागू होणार नवा निर्णय

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 24, 2014 08:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...