आता रेल्वे तिकीटासाठी किती पैसे मोजावे लागणार?

आता रेल्वे तिकीटासाठी किती पैसे मोजावे लागणार?

 • Share this:

756railway ticket price hike20 जून : रेल्वे बजेट सादर होण्याअगोदरच मोदी सरकारने भाडेवाढ करुन सर्वसामान्यांना झटका दिलाय. रेल्वे प्रवासात 14.2 इतकी घसघशीत दरवाढ करण्यात आलीय. त्यामुळे आता तिकीटासाठी किती पैसे मोजावे लागणार आहे असा प्रश्न प्रवाशांना पडलाय.

जर तुम्ही मुंबई ते पुणे असा डेक्कन क्वीन एक्स्प्रेस अथवा इतर कोणत्याही एक्स्प्रेसने प्रवास केला तर आरक्षित नॉन एस्सीसाठी पूर्वी 95 रुपये मोजावे लागत होते ते आता 109 रुपये मोजावे लागणार आहे. तर मुंबईहून विदर्भात जाण्यासाठी नंदीग्राम एक्स्प्रेस अथवा कोणत्याही एक्स्प्रेसने प्रवास केला तर पूर्वी आरक्षित स्लीपर क्लाससाठी 440 रुपये दर होता तो आता 503 वर पोहचला आहे.

पश्चिम महाराष्ट्रात जाण्यासाठी तुम्ही जर रेल्वेने प्रवास करणार असाल तर कोल्हापूरसाठी महालक्ष्मी एक्स्प्रेसने आरक्षित स्लीपर क्लाससाठी पूर्वी 265 रुपये मोजावे लागत होते आता 303 रुपये मोजावे लागणार आहे. जर राज्याबाहेर प्रवास करायचा असेल तर एसी फर्स्ट क्लासने दिल्ली गाठण्यासाठी पूर्वी 4,135 रुपये मोजावे लागत होते तर आता 4,722 रुपये मोजावे लागणार आहे. एकंदरीतच रेल्वे प्रवासात अच्छे दिन संपले असून बुरे दिन सुरू झाले आहे.

राज्यात प्रवासासाठी

मुंबई-पुणे डेक्कन क्वीन एक्स्प्रेस

 • आरक्षित नॉन एसी
 • पूर्वी: 95 रु.
 • आता: 109 रु

मुंबई-नागपूर नंदीग्राम एक्स्प्रेस

 • आरक्षित स्लीपर क्लास
 • पूर्वी: 440 रु.
 • आता: 503रु.

मुंबई-कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेस

 • आरक्षित स्लीपर क्लास
 • पूर्वी: 265 रु.
 • आता: 303 रु.

राज्याबाहेर प्रवासासाठी

मुंबई-दिल्ली राजधानी एक्स्प्रेस

 • एसी फर्स्ट क्लास
 • पूर्वी : 4135 रु.
 • आता : 4722 रु.

मुंबई-दिल्ली राजधानी एक्स्प्रेस

 • एसी सेकंड क्लास
 • पूर्वी : 2495 रु.
 • आता : 2849 रु.

मुंबई-दिल्ली राजधानी एक्स्प्रेस

 • एसी थर्ड क्लास
 • पूर्वी : 1815 रु.
 • आता : 2072 रु

First published: June 20, 2014, 8:33 PM IST

ताज्या बातम्या