'जगात भारी कोल्हापुरी'

आंदोलनांची आणि चळवळीची परंपरा कोल्हापूरमध्ये आजही पहायला मिळते. नुकत्याच झालेल्या गणेशोत्सवात कोल्हापूरकरांनी डॉल्बीमुक्तीचा ध्यास घेतला आणि न भुतो न भविष्यती अशी गणरायाची मिरवणूक कोल्हापूरमध्ये पार पडली.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Sep 7, 2017 02:27 PM IST

'जगात भारी कोल्हापुरी'

संदीप राजगोळकर, प्रतिनिधी

असं म्हटलं जातं की कोल्हापुरात जे पिकतं ते राज्यात टिकतं. याच कोल्हापूरनं राज्यातला पहिला टोलविरोधी लढा उभारला आणि कोल्हापूरकरांनी टोल हद्दपार केला. त्यानंतर आंदोलनांची आणि चळवळीची परंपरा कोल्हापूरमध्ये आजही पहायला मिळते. नुकत्याच झालेल्या गणेशोत्सवात कोल्हापूरकरांनी डॉल्बीमुक्तीचा ध्यास घेतला आणि न भुतो न भविष्यती अशी गणरायाची मिरवणूक कोल्हापूरमध्ये पार पडली.

कोल्हापूर म्हणजे तांबडा पांढरा रस्सा आणि झणझणीत मिसळीचं फेमस शहर. जगात भारी अशीही याच कोल्हापूरची ओळख. राज्यात पहिल्यांदाच कोल्हापूर शहरात टोल लावला गेला. पण रस्त्यांची काम नीट झालेली नसतानाही अंगावर आलेलं टोलचं भूत कोल्हापूरकरांनी एकजुटीनं नाकारलं. अनेक आंदोलनं झाली आणि त्यानंतर कोल्हापूरचा टोल रद्द झाला.

सध्याही कोल्हापूरमध्ये अंबाबाई मंदिरातल्या पुजाऱ्यांच्या विरोधात आंदोलनाची धार तीव्र होताना दिसतेय. कोल्हापूरमध्ये राजकीय पक्ष, नेते यांच्यात मतभेद आहेत. नाही असं नाही. पण ज्यावेळी एखादी चळवळ उभी राहते त्यावेळी कोल्हापूरकर एकत्र येतात आणि त्या प्रश्नाची कड लावतात. हाच इथला इतिहास आहे.

राजर्षी शाहू महाराज आणि करवीर संस्थानच्या संस्थापिका महाराणी ताराराणी यांचा वारसा लाभलेल्या या शहरात गेल्या दशकात गणेशोत्सव मिरवणूक म्हणजे डॉल्बी आणि डॉल्बी म्हणजे गणेशोत्सव हे सूत्रच झालं होत. अनेकदा याच डॉल्बीमुळं अपघात झाले. अनेकांची आयुष्य उद्धवस्तही झाली. पण यंदा मात्र कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी ध्यास घेतला आहे. डॉल्बीमुक्तीचा ध्यास. आणि झालंही तसंच. चंद्रकांत दादांनी जे डॉल्बी लावतील त्यांना कायद्याचा धाक दाखवला. पोलीस अधिकाऱ्यांनी गणेश मंडळांचं प्रबोधन केलं.

Loading...

मग काय विसर्जनाच्या दिवशी सकाळी मानाच्या तुकाराम माळी गणपतीची पुजा झाल्यावर पारंपारिक वाद्यांचा नाद अख्ख्या कोल्हापूरात घुमला. कोल्हापूरचॆ महाद्वार म्हणजे काटा किर्रररर गर्दी. त्यात कानठळ्या बसवणारा डॉल्बीचा आवाज. हेच चित्र यंदाही असणार अशी चर्चा शहरासह जिल्ह्यात होती. पण जी मंडळ डॉल्बी लावणार अशी शक्यता होती त्याच मंडळांनी साधेपणानं पारंपारिक वाद्यांना पसंती देत मिरवणुकीत सहभाग घेतला. त्याचा आनंद घेण्यासाठी कोल्हापूरचे आबालवृद्धही रस्त्यावर आले. आणि सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास टाकला. फक्त आकर्षक रोषणाई, ढोलताशे, लेझिम, सनई यांचाच सूर मिरवणूक मार्गावर अनुभवायला मिळाला. काही लोकप्रतिनीधींनी डॉल्बीचं समर्थन केलंही नाही असं नाही. एका राजकीय पक्षानं तर थेट हिंदूंच्याच सणाचा दाखला देत पोलीस खात्यावर आसुड ओढण्याचाही प्रयत्न केला. पण अखेर कोल्हापूरकर जिंकलेच. आणि दरवर्षीपेक्षा लवकर कोल्हापूरच्या विसर्जन मिरवणुकीची सांगता झाली.

या सगळ्या बाबतीत कौतुक करावं लागेल ते कोल्हापूर पोलिसांचं. पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी धाडस दाखवलं. आणि त्याच धाडसाला कोल्हापूरनंही डोक्यावर घेत त्यांना प्रतिसाद दिला. त्यामुळंच हे शक्य झालं. यापुर्वीही मूर्तीदान उपक्रम राबवून याच कोल्हापूरनं पर्यावरणपुरक गणेश विसर्जनाचा पायंडा पाडला. त्यामुळं कोल्हापूरकरांचं स्पिरिट जगात भारी आहे यात शंका नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 7, 2017 02:27 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...