उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक तोंडावर, भाजपमध्ये सन्नाटा !

देशाचा राष्ट्रपती कोण होणार हे आता जवळपास निश्चित असलं तरी देशाचा पुढचा उपराष्ट्रपती कोण होणार ? हा प्रश्न अजूनही अनुत्तरीतच आहे.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jul 6, 2017 06:03 PM IST

उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक तोंडावर, भाजपमध्ये सन्नाटा !

कौस्तुभ फलटणकर, नवी दिल्ली

 

6 जुलै : देशाचा राष्ट्रपती कोण होणार हे आता जवळपास निश्चित असलं तरी देशाचा पुढचा उपराष्ट्रपती कोण होणार ? हा प्रश्न अजूनही अनुत्तरीतच आहे. अशातच आता उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीला फक्त एक महिना शिल्लक आहे आणि हा प्रश्न आता आणखीच गूढ होत चाललाय.

मोदींच्या धक्कातंत्र देण्याच्या सवईमुळे सगळ्या इच्छुकांची पंचाईत झाली आहे कारण यापैकी काही नेते गेल्या अनेक दिवसांपासून आपले नाव उपराष्ट्रपती पदासाठी पुढे यावे, यासाठी प्रयत्न करीत होते पण राष्ट्रपतींचे नाव निवडताना मोदी आणि अमित शाह जोडगोळीने जो धक्का दिलाय त्यातून भाजपचे बडे नेते अजूनबी सावरु शकलेले नाहीयेत. विशेषतः थावरचंद गहलोत यांना तर अमित शाह यांनी तुम्हाला राष्ट्रपती करण्यात येईल असे स्पष्ट संकेत दिले होते पण उस्ताही गहलोत समर्थकानी ही बातमी मीडियात लीक केली आणि गहलोत यांचा पत्ता ऐनवळी कट झाला. थोडक्यात मिडियात चर्चिल्या गेलेल्या एकाही नावाचा मोदी - अमित शहांनी साधा विचार सुद्धा केला नाही. हा सर्वांनाच मोठा धक्का होता.

भाजप पक्षात यावेळी जेष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री व्यंकया नायडु हे उपराष्ट्रपती  होण्यासाठी सगळ्यात जास्त इच्छूक आहेत, त्यापाठोपाठ मुरली मनोहर जोशी, नजमा हेपतुल्ला, हुकुम नारायण यादव हे नेतेही या पदासाठी इछूक आहेत. उपराष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकायला दोन्ही सभगृहातील खासदार मिळून 393 मतांची आवश्यकता आहे आणि एनडीएकडे तब्बल 444 खासदारांचे समर्थन आहे. त्यामुळे भाजप जे नाव निश्चित करेल तीच व्यक्ति उपराष्ट्रपति होणार हे जवळपास निश्चित आहे.

Loading...

भाजपाकडे 2018 पर्यंत राज्यसभेत बहुमत नसणार आहे. अशा परिस्थितीत ज्याचा संसदीय कामकाजाचा जास्त अनुभव आणि जो कठीण परिस्थितीत सरकारला सहिसलामत वाचवू शकेल, त्याचीच या पदावर वर्णी लागण्याची शक्यता जास्त आहे. दूसरीकडे राष्ट्रपती उत्तरेचा तर उपराष्ट्रपतीपद दक्षिणेकडे जाऊ शकतं. भाजपाने 2019 सालच्या सार्वत्रिक निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन दक्षिणेकडील राज्यांकडे अधिक लक्ष द्यायला सुरवात केली आहे. हे बघता व्यंकया नायडू यांचे नाव सध्यातरी आघाडीवर दिसतंय पण देवेंद्र फडणवीस यांच्या निवडीपासून ते थेट रामनाथ कोविंद यांच्या निवडीपर्यंत मोदींनी जे धक्कातंत्र वापरले ते बघता मोदींच्या मनात उपराष्ट्रपती पदासाठी कोणते नाव आहे हे कोणीच छातीठोकपणे सांगू शकत नाही. त्यामुळे मोदी-शहा जोडगोळी उपराष्ट्रपतीपदासाठी ऐनवेळी कोणाचं नाव पुढे करतंय हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 6, 2017 06:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...